Mumbai News : मुंबई : शिवसेनेच्या ” त्या” जाहिरातीवरुन भाजप आणि शिवसेनेत वादंग माजला. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी भाजप नेत्यांवर टीका करताना थेट औकातीची भाषा केली. या प्रकारानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीवर समाधान व्यक्त केलं. शिवसेनेकडून केलेल्या दुरुस्तीचे स्वागत करत त्यांनी शिवसेनेला एक मोलाचा सल्ला देखील दिला.
ही युतीसाठी चांगली गोष्ट
शिवसेनेला सल्ला देताना बावनकुळे म्हणाले की, आम्ही संतुष्ट किंवा असंतुष्ट असण्याचा प्रश्नच येत नाही. शिवसेनेने काल जी जाहिरात दिली, त्यामध्ये काही खोडसाळपणा झाला होता, हे खरं आहे. (Mumbai News) मात्र, त्यामागे त्यांची भावना चुकीची नव्हती. आज तो खोडसाळपणा दुरुस्त केला आहे. आज जाहिरातीचे चांगल्या पद्धतीने प्रेझेन्टेशन झाले आहे. याचाच अर्थ आज खोडसाळपणा दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला, ही युतीसाठी चांगली गोष्ट आहे. कुणीतरी लहान व्हावं, कुणीतरी मोठं व्हावं, असा सल्ला चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.
एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांचा फोटो त्यांनी आज त्यांचा गट म्हणून छापला आहे. त्यामध्ये कोलीत लावणं योग्य नाही. त्यांनी त्यांच्या शिवसेना पक्षाने दिलेली आणि त्यांच्या मंत्रिमंडळात काम करणाऱ्या मंत्र्यांकडून चांगल्या भावनेने नवी जाहिरात छापली आहे. खरंतर त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. खोडसाळपणा झाला होता, पण त्यांनी चांगल्या भावनेने दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. हेच महाराष्ट्राला आणि युतीला अपेक्षित आहे. (Mumbai News) एकत्र काम करताना काही चूका होत असतात. आमच्याकडून चूक झाली तर ती आम्ही दुरुस्त केली पाहिजे. त्यांच्याकडून काही चूक झाली तर त्यांनी दुरुस्त केली पाहिजे. मला वाटतं आता हा विषय संपलेला आहे, अशा शब्दांत चंद्रशेखर बावनकुळे यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
बावनकुळे म्हणाले की, या राज्याचं नेतृत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चांगल्या पद्धतीने करत आहेत. आम्ही सरकारमध्ये आहोत. आमच्या १०५ आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवला. आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला. केंद्रीय नेतृत्वाने विश्वास ठेवला. आम्हाला त्यांचा पक्ष सांभाळण्याची गरज नाही. एकनाथ शिंदे सक्षम आहेत, अशी प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिली.
दरम्यान, मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हा होणार, असा प्रश्न सातत्याने विचारला जातो. कुणाला मंत्री म्हणून नेमायचं, कुणाला ठेवायचं आणि कुणाला कमी करायचं, हा संपूर्ण अधिकार एकनाथ शिंदे यांना आहे. (Mumbai News) त्यामुळे तुम्हाला एकनाथ शिंदे भेटल्यानंतर त्यांना तुम्ही विचारा. शेवटी अधिकार त्यांचा आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. यापुढे आपल्यासाठी जाहिरातीचा विषय संपलेला आहे, असं बावनकुळे म्हणाले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Mumbai News : शिंदेंची जाहिरात सरड्यासारखी… जितेंद्र आव्हाडांची टीका; म्हणाले,…