पुणे- शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे #Vinayak Mete death यांच्या पार्थिवावर आज (सोमवारी) दुपारी तीन वाजता अंतिमसंस्कार होणार होणार आहेत. विनायक मेटे यांचे पुणे-मुबंईर द्रुतगतीमार्गावर रविवारी पहाटे अपघाती निधन झाले होते. मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रात अनेक आंदोलन उभी केली. अखेरपर्यंत मराठा आरक्षणासाठी लढत राहिले. अखेरचा मृत्यूही मराठा आरक्षणाच्या बैठकीसाठी येत असताना झाल्याने मराठा समाजात शोक व्यक्त केला जातो आहे.
दरम्यान आज (सोमवारी) दुपारी ४ वाजता विनायक मेटे यांच्या शेतात त्यांच्या पार्थिवावर अंतिमसंस्कार होणार असल्याची माहिती शिवसंग्राम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच अंतिमसंस्कारांच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर राहणार आहेत.
शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांचा रविवारी पहाटे ५ वाजता मुंबई पुणे महामार्गावर झालेल्या अपघातात मेंदूला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मेटेंच्या अपघाती मृत्यूने सर्वच स्तरात हळहळ व्यक्त केली जात आहे. विनायक नेटे यांच्या अपघाताबाबत सर्वपक्षीय नेत्यांनी शंका उपस्थित केल्याने, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशीचे या प्रकरणाची तात्काळ दिले आहेत. पोलिसांनी चौकशीसाठी विनायक मेटे यांच्या गाडीचा ड्रायव्हर एकनाथ कदम याला ताब्यात घेतले आहे.
रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास विनायक मेटे यांचे पार्थिव मुंबईतून बीड शहरात मध्यरात्री आणले आहे. ते शिवसंग्राम कार्यालयात अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. अंत्यदर्शन झाल्यानंतर त्यांची अंतिम यात्रा अण्णाभाऊ साठे मार्गे जालना रोडकडून डीपी रोडवर असलेल्या विनायक मेटे यांच्या शेतात जाणार आहे. त्या ठिकाणी मेटे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. स्थानिक प्रशासनाकडून याची तयारी सुरू झाली आहे.