Pimpri News : पिंपरी : हाती भगवी पताका, टाळ मृंदागाचा ताल, ज्ञानोबा-तुकोबाचा जयघोष करत अवघा पिंपरी-चिंचवडचा परिसर दुमदुमुन गेला. उद्योगनगरीचा पाहुणचार घेऊन श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सोमवारी पुण्याकडे मार्गस्थ झाला.(Tukoba’s palkhi en route to Pune)
दर्शन घेण्यासाठी नागरिकांची गर्दी
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा रविवारी सायंकाळी उद्योगनगरीत दाखल झाला होता. आकुर्डीतील विठ्ठल रखुमाई मंदिरात दुसरा मुक्काम झाला. रात्री पालखी तळावर कीर्तन झाले.(Pimpri News) त्यानंतर जागर झाला. पिंपरी-चिंचवडकरांनी भक्तिभावाने पालखीला निरोप दिला. पहाटेपासूनच नागरिक जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर दुतर्फा थांबलेले होते. पालखीचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
सोमवारी पहाटे संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांच्या उपस्थितीत मंदिरात महापूजा झाली. महापालिका आयुक्त शेखर सिंह, त्यांच्या पत्नी ईशा सिंह यांनी पादुकांचे पूजन केले. (Pimpri News) काकड आरती झाली. त्यानंतर सोहळा मार्गस्थ झाला. पहाटेपासूनच नागरिक जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर दुतर्फा थांबलेले होते. खंडोबा माळ चौकातून सोहळा मुंबई-पुणे महामार्गाने पुण्याकडे निघाला. साडेसातच्या सुमारास पालखी खराळवाडी येथील विठ्ठल मंदिरात सकाळच्या विसाव्यासाठी थांबली. दिंड्याही थांबल्या. तिथे न्याहरी केल्यानंतर पालखी सोहळा पुढे निघाला.
साडेअकराच्या सुमारास पालखी दापोडी येथे पोहोचली. (Pimpri News) दुपारची विश्रांती घेतल्यानंतर हॅरीस पुलावरून पुण्यातील बोपोडीत प्रवेश केला. आकुर्डीपासून दापोडीपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा थांबून भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. भक्तीमय वातावरणात पिंपरी-चिंचवडमधील भाविकांनी पालखीला निरोप दिला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri News : व्यावसायिकाकडे हप्ता मागत केली दुकानाची तोडफोड; तिघांना ठोकल्या बेड्या..
Pimpri News : पिंपरी-चिंचवड : काळेवाडीत तरुणावर चॉपर, कोयत्याने वार करत खुनी हल्ला