Pune News : पुणे : पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट काढण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याआधीही अनेक वेळा जिल्हाधिकारी यांच्या नावे बनावट फेसबुक अकाउंट काढण्यात आले होते. दरम्यान शहरात गेल्या काही दिवसांपासून सायबर गुन्हेगारींच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. मात्र अद्यापपर्यंत सामान्य माणून सायबर चोरट्यांच्या रडारवर होता आता मात्र या थेट जिल्हाधिकारीच सायबर भामट्यांच्या निशाणावर आले आहेत. ( Another fake Facebook account in the name of Dr. Rajesh Deshmukh; Collector of Pune )
संपर्कातील व्यक्तींना मेसेज आणि फोन करून पैशांची मागणी
याआधी अनोळखी चोरट्यांनी ‘माही वर्मा’ या नावाने हे बनावट अकाउंट तयार केले असून त्या अकाउंटवर जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांचे छायाचित्र लावण्यात आले आहे. त्याद्वारे जिल्हाधिकारी देशमुख यांच्या संपर्कातील व्यक्तींना मेसेज आणि फोन करून पैशांची मागणी करण्यात आली. मात्र सतर्क असलेल्या जिल्हाधिकारी यांच्या संपर्कातील लोकांनी याबाबतची माहिती डॉ. देशमुख यांना तात्काळ कळवले त्यामुळे याप्रकरणी जिल्हाधिकारी यांनी तातडीने लेखी अर्ज पुणे पोलीस आयुक्त यांच्याकडे देऊन संशयित आरोपीचा शोध घेण्यात यावा आणि त्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केलेली आहे. (Pune News ) यावेळी पुन्हा एकदा देशमुख यांचे नाव आणि फोटो वापरून बनावट फेसबुक अकाऊंट तयार केल्याचा प्रकार समोर आला आहे. यापूर्वी ४ ते ५ वेळेला त्यांचे बनावट फेसबुक अकाऊंट तयार करण्यात आले होते आणि त्यांच्या मित्र परिवारातील अनेक जणांना “रिक्वेस्ट” सुद्धा पाठवण्यात आल्या होत्या.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी याबाबत पोलीसात तक्रार दाखल केली असून त्यामध्ये फेसबुकवर माझ्या नावाने तयार करण्यात आलेले अकाउंट माझे नसून कुठल्या ही प्रकारच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका, असे आवाहन स्वतः देशमुख यांनी केलं आहे.(Pune News ) तसेच या संदर्भात राजेश देशमुख यांनी सायबर पोलिसांना माहिती दिली आहे. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांचे नाव वापरून याआधी तीन वेळा काही अज्ञातानी फेसबुक अकाऊंट तयार केले होते. आता पुन्हा तिसऱ्यांदा केले आहे.