अजित जगताप
पुसेगाव : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून सर्वांना हक्क देण्याचे काम केले आहे त्यामुळे खटाव तालुक्यातील रिपाई कार्यकर्ते अमृतमहोत्सवी स्वतंत्र दिन मोठ्या उत्साहाने साजरा करतील अशी माहिती रिपाई चे खटाव तालुका संपर्क प्रमुख अजिंक्य वाघमारे यांनी दिली
खटाव तालुक्यात 140 गावे असून प्रत्येक गावात दलित बांधव राहत आहेत देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्षे झाली आहेत हा आनंदाचा क्षण आहे स्वातंत्र्य लढ्या मध्ये फार पुर्वी पासून दलित समाज सहभागी झालेला आहे. भिमा कोरेगाव, भारत पाक युद्ध, भारत चीन युद्ध , कारगिल युद्ध अशा अनेक पातळीवर मागासवर्गीयांनी यशस्वी लढा दिला आहे आज घर घर तिरंगा व संविधानाची गरज आहे. रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तिरंगा ध्वज व संविधान प्रत वितरीत करण्याची भूमिका घेतली आहे त्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्ताकडे नाव नोंदणी करावी असे पक्षाच्या वतीने सूचित केले आहे
खटाव तालुका दुष्काळी असला तरी देश प्रेमाने भारावलेले लोक या ठिकाणी राहतात सर्व धर्म समभाव मानणारे खटाव कर यंदा च्या अमृत मोहत्सवी झेंडा वंदन ऐतिहासिक रित्या साजरा करतील याबाबत कोणाच्या ही मनात शंका नाही सध्या पुसेगाव, खटाव ,ललगुण, कुमठे,गोरेगाव वांगी, निमसोड, पुसेसावली,गोपूज,मायणी ,औधं, मोळं, डिस्कल, विसापूर ,चितळी ,वडी अंबावडे,वर्धनगड या गावांना भेटी दिल्या असून रिपब्लिकन कार्यकर्ते वाड्या वस्त्यांवर स्वछता मोहीम राबवत आहेत.
अमृतमहोत्सवी स्वतंत्र दिन म्हणजे आनंदाचा क्षण असला तरी जिल्हा प्रशासनाने या भागातील नागरी सुविधां कडे लक्ष घालावे आनेक ठिकाणी दळण वळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे रस्त्या अभावी मागासवर्गीयांना अडचणींना तोंड द्यावे लागते याचीही प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी असा रिपाई च्या बैठकीत जिल्हा अध्यक्ष अशोक बापू गायकवाड यांच्या मार्गदर्शना वरून ठराव करण्यात आला
या वेळी रि पा इ जिल्हाउपाध्यक्ष कुणाल गडांकुश ,युवक जिल्हा उपाध्यक्ष मयूर बनसोडे, अजित नलवडे अजित कंठे, संतोष भांडारे, अण्णा कंठे, इंजे, भोसले, समाधान जाधव, निलेश पाटोळे, बाळासाहेब बुधावले, गणेश वाघमारे, अंकुश पिसे ,अर्जुन शिंदे, मयूर पाटोळे ,अमोल यलमर (सरपंच) व खटाव तालुका सम्पर्क प्रमुख अजिंक्य वाघमारे उपस्थित होते.