दीपक खिलारे
Indapur News : इंदापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर देशातील जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी पुरवठ्यासाठी तब्बल एक लाख कोटी निधी असणारा जल जीवन मिशनचा कार्यक्रम हाती घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा महत्त्वकांक्षी कार्यक्रम असून, देशात डिसेंबर 24 पर्यंत प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी देण्याचा त्यांचा संकल्प आहे, अशी माहिती केंद्र सरकारच्या जलशक्ती विभागाचे राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी सोमवारी (ता. ५) घोलपवाडी (ता.इंदापूर) येथे दिली. (Prime Minister Narendra Modi’s pledge to provide tap water to every home in the country by December 24; Prahlad Singh Patel)
पाणीपुरवठा योजनेच्या 102 कोटीच्या कामाचे भूमिपूजन
उद्धट प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या 102 कोटी रुपये खर्चाच्या कामाची भूमिपूजन प्रल्हादसिंह पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. (Indapur News) या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे होते.
यावेळी भाजपाचे राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य संजय टंडन, आ. राम शिंदे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, बाळासाहेब गावडे, रंजन तावरे, दिलीप खैरे, अविनाश मोटे, वासुदेव काळे, जालिंदर कामठे, अंकिता पाटील ठाकरे, राजवर्धन पाटील, करणसिंह घोलप, (Indapur News) लालासाहेब पवार, अँड.शरद जामदार यांची प्रमुख उपस्थिती होती.
पटेल म्हणाले, हर हर जल ही योजना केवळ केंद्र सरकारची योजना नसून आपली सर्वांचीच आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागासाठी प्रति माणशी 55 लि. पाणी दिले जाणार आहे. या योजनेसाठी जलस्त्रोत हा 30 वर्ष टिकणारा असेल तरच तो स्थायी स्वरूपाचा ग्राह्य धरावा, तसे असेल तरच योजना करावी असा केंद्र शासनाचा आदेश आहे. (Indapur News)n योजनेचा डी पी आर ग्रामपंचायतीला दिला पाहिजे. योजनेचा डीआरपी बनवताना जनतेला ग्रामपंचायतीला विश्वासात घेतले पाहिजे. या योजनेचा दुरुपयोग होता कामा नये. हरघर हरजल योजनांच्या पाण्याच्या जलस्त्रोत संदर्भात अधिकाऱ्यांना 20 दिवसात अहवाल देण्याचे आदेश मी आता दिले आहेत.
जल जीवन मिशनच्या सर्व योजनांसाठी केंद्र सरकारने थर्ड पार्टी प्रमाणपत्र तपासणी अहवाल आल्याशिवाय योजना पूर्ण झाले असे समजले जाणार नाही, नियमबाह्य पद्धतीने होणाऱ्या योजनांच्या कामाची चौकशी होईल, असा इशारा या खात्याचे मंत्री असलेले पटेल यांनी दिला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी हर घर जल योजनेसाठी इंदापूर तालुक्याला 725 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिल्यामुळे त्यांचे अभिनंदन केले.(Indapur News)
हर्षवर्धन पाटील म्हणाले, इंदापूर तालुक्यात रस्त्यांची ज्या पद्धतीने कामे झाली आहेत. पुढे डांबर टाकले जाते व मागे तेच डांबर हाताने उचकटते अशा पद्धतीने कामे सध्या तालुक्यात सुरू आहेत. तसेच झालीही आहेत असे सांगून असे निष्कृष्ट दर्जाचे काम जल जीवन मिशन मध्ये होऊ नये. जल जीवन मिशन ही जनतेच्या आरोग्याशी निगडित आहे.
जर या योजना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार झाल्या नाहीत, तर त्याची जनतेला झळ 30 वर्षे सहन करावी लागणार आहे. (Indapur News) परिणामी अनेक ठिकाणी जनतेला पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागेल अशी चिंता ही पाटील यांनी व्यक्त करुन ही योजना गुणवत्तापूर्ण होण्यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी, असे हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी नमूद केले.
याप्रसंगी तानाजी थोरात, सरपंच रवींद्र यादव यांनी मनोगत व्यक्त केले. तर जल जीवन मिशनच्या दोन अधिकाऱ्यांनी योजनेची माहिती दिली.
या कार्यक्रमास मारुती वनवे, विलास माने, देवराज जाधव, वसंत मोहोळकर, उदयसिंह पाटील, मयूरसिंह पाटील, संग्रामसिंह निंबाळकर, कुमार गायकवाड,(Indapur News) नितीन माने, पिंटू काळे, लालासाहेब सपकळ, विजय पांढरे, दीपक काटे, बालाजी घोलप, माऊली चवरे, माऊली वाघमोडे, गजानन वाकसे यांचेसह तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी, गावोगावचे सरपंच,कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थितांचे आभार धर्मेश थोरात यांनी मानले.