Pune News : पुणे : महाराष्ट्र पोलीस दलातील कोकण, नांदेड, छत्रपती संभाजीनगर भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम मिळवून देण्याच्या आमिष दाखवत एका व्यावसायिकाला ३० लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. (Contract for installation of CCTV cameras for police force; cheated for 30 lakh rupees to a businessman)
सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल
याबाबत एका व्यावसायिकाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी अजित शहा (वय ४५), मयुरा शहा (वय ३६), संदीप दरेकर (वय ३२), साईराज परवत, जगदीश चौबे (वय ५०), सवी सैनी (वय ४३), संगीता शर्मा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune News) तक्रारदार व्यावसायिकाची आरोपींशी ओळख झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र पोलीस दलातील नांदेड, कोकण, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रात पोलिसांकडून बसविण्यात येणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे काम मिळवून देण्याचे आमिष आरोपींनी दाखविले होते. (Pune News) आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा ठेका मिळवून देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाकडून ३० लाख रुपये उकळले. त्यानंतर व्यावसायिकाला सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम मिळवून दिले नाही. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक पाठक तपास करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : आई अन् मुलाने एकत्र दहावीची परीक्षा देत मिळवले यश; कचरावेचकांच्या कष्टाचा पहिला विजय
Pune News : पुण्यात राँग साईडने येणाऱ्या कारची दुचाकीला धडक; दोघांचा जागीच मृत्यू