Loni Kalbhor: लोणी काळभोर, (पुणे) : थेऊर (ता. हवेली) येथील चिंतामणी विद्या मंदिर या विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल ८६.११ टक्के लागल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब नेवाळे यांनी दिली. (Omkar Panchal stood first in 10th examination in Chintamani Vidyalaya, Theur; The overall result of the school is 86.11 percent..)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज शुक्रवारी (ता. ०२) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला. (Loni Kalbhor) विद्यालयातील ७२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यातील ६२ विद्यार्थी पास झाले आहेत.
यामध्ये विद्यालयातील प्रथम पाच आलेले विद्यार्थी
प्रथम क्रमांक ओमकार प्रभू पांचाळ ८८.८० टक्के, द्वितीय कुमार आण्णा भिसे ८८.६० टक्के, तृतीय जैनी सुजाराम चौधरी ८७.८० टक्के, चतुर्थ तनिष्का सर्जेराव कांबळे ८२.८० टक्के, व प्रदीप मल्लिनाथ कट्टीमनी ७८ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे पदाधिकारी आणि शिक्षकांनी अभिनंदन केले
दरम्यान, सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अध्यक्ष संजय गोंदे, उपाध्यक्ष द्वारकानाथ पवार, (Loni Kalbhor) मुख्याध्यापक बाळासाहेब नेवाळे, पर्यवेक्षक मधुकर खरात यांनी अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.