युनूस तांबोळी
Shirur News : शिरूर : जांबूत ( ता. शिरूर ) येथील आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा शेकडा निकाल 100 टक्के लागला असून शंभर टक्के निकाल यशाची परंपरा कायम राखल्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रा. गणेश गुंजाळ यांनी दिली. (Adarsh Vidyalaya of Jambut got 100 percent result of 10th class)
पालकांनी मानले शिक्षकांचे आभार
या शाळेतून दहावीसाठी अवघे 6 विद्यार्थी बसले होते. (Shirur News) या विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक जोरी सुजल भागिनाथ 77.80 टक्के, व्दितीय क्रमांक पोळ प्रणव दादाभाऊ 77.40 टक्के, तृतीय क्रमांक लंघे कोमल संतोष 76.60 गुण मिळवून यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे पालक व ग्रामस्थांनी आभार मानले आहे.
यावेळी आदर्श स्कूल माध्यमिक व उच्च माध्यमिक जांबूतचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवाजी जगताप म्हणाले की, ‘यशस्वी विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक युगात विज्ञान शाखेचा अवलंब करून बारावी सारख्या शाखेतून पदवीधर व्हावे, त्यातून वेगवेगळ्या क्षेत्रात नावलौकीक करावा.(Shirur News)वाणिज्य व कला शाखेतून देखील स्पर्धा परीक्षांना वाव आहे. आत्तापासून स्पर्धा परिक्षांचा अभ्य़ास करा. आपले जीवन बलशाही बनवायचे असेल तर कष्ट, चिकाटी व जिद्दी शिवाय यशाला पर्याय नाही.’
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : कवठे येमाई न्यू इंग्लिश स्कूलचा निकाल ९४.७९ टक्के
Shirur News : जांबूत येथील जय मल्हार हायस्कूलचे दहावीत १२८ विद्यार्थी उत्तीर्ण; ९९.२२ टक्के निकाल