Uruli Kanchan News : उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन येथील अजिंक्य चॅरिटेबल फाउंडेशन संचलित डॉ. अस्मिता प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. अशी माहिती संचालक. डॉ. अप्पासाहेब जगदाळे यांनी दिली. (Dr. from Uruli Kanchan. 100% result of class 10th of Asmita Primary, Middle and Higher Secondary School in the first year; In the result, the girls won..)
निकालात मुलींनी मारली बाजी..
प्रथम रक्षा निलेश ओसवाल ८९.२० टक्के, द्वितीय अनुजा रोहिदास टिळेकर ७६.८० टक्के, तृतीय ऐश्वर्या राजू हागलदुडगे ७६.६० टक्के गुण मिळविले आहेत.
विद्यार्थीच्या या उज्जवल यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महादेवराव कांचन, सचिव अजिंक्य कांचन, संचालक डॉ. अप्पासाहेब जगदाळे, प्राचार्य रोहिणी जगताप, उपप्राचार्या चव्हाण, (Uruli Kanchan News) संपूर्ण स्टाप यांनी विद्यार्थांचे अभिनंद केले. तसेच पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाची इयत्ता दहावीची पहिली तुकडी असतानाहि १०० टक्के निकाल लागल्याने उरुळी कांचन व परिसरातून विशेष कौतुक केले जात आहे.
दरम्यान, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महादेवराव कांचन म्हणाले, “यशस्वी विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक युगात विज्ञान शाखेचा अवलंब करून बारावी सारख्या शाखेतून पदवीधर व्हावे. त्यातून वेगवेगळ्या क्षेत्रात नावलौकीक करावा. वाणिज्य व कला शाखेतून देखील स्पर्धा परीक्षांना वाव आहे. आत्ता पासून स्पर्धा परिक्षांचा अभ्य़ास करा. आपले जीवन बलशाही बनवायचे असेल तर कष्ट, चिकाटी व जिद्द शिवाय यशाला पर्याय नाही.”