Pachgani News: पाचगणी : गोडवली (ता. महाबळेश्वर) येथील भारती विद्यापीठ हायस्कूलच्या फेब्रु/मार्च एस.एस.सी २०२३ परीक्षेचा विद्यालयाचा निकाल १००% लागला असल्याची माहिती मुख्याध्यापक शहाजी सावंत यांनी दिली. (Bharti Vidyapeeth High School 10th Result 100 Percent)
या हायस्कूलमधून फेब्रु/मार्च एस.एस.सी २०२३ दहावीची परीक्षेसाठी १४ विद्यार्थी बसले होते. सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
यामध्ये प्रथम तीन विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
१) विवेक विठोबा मोरे ८५.८०%
२) श्रावणी कृष्णा कोंढाळकर ८०.८०%
3) यश विकास जाधव ७६.०%
व्यवस्थापनाने केले विद्यार्थ्यांचे अभिनंदन
या निकालात प्रथम श्रेणी ०५, द्वितिय श्रेणी ०५ आणि पास श्रेणीत ०१ अशी एकूण १४ मुले पास झाले आहेत. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शाळेचे मुख्याध्यापक शहाजी सावंत, शिक्षक आर.वाय. देशमुख, कुमार कांबळे, प्राजक्ता माने, शिक्षकेतर सेवक, कुंभार, जाधव मामा यांचे मोलाचे योगदान आहे. (Pachgani News) १००% निकालाची परंपरा राखणाऱ्या सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे भारती विद्यापीठ शालेय शिक्षण विभागाच्या अध्यक्षा विजयाला कदम (वहिनीसाहेब), अरुंधती निकम, एम. डी. कदम यांनी अभिनंदन केले आहे आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pachgani News : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन !
Pachgani News : भोसे खिंडीेजवळ रस्त्यावरील वठलेल्या झाडाच्या फांद्यांचा होतोय प्रवाशांना त्रास