Loni Kalbhor : लोणी काळभोर, (पुणे) : कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील ग्रामीण सर्वांगीण विकास विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल ९१.४८ टक्के लागल्याची माहिती मुख्याध्यापिका कल्पना मुखवटे यांनी दिली. (Anushka Duthde passed first, Aditi Kunjir second and Mansi Kashyap third in Rural Comprehensive Development School at Kunjirwadi; The overall result of the school is 91.48 percent..)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज शुक्रवारी (ता. ०२) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला. (
Loni Kalbhor)
विद्यालयातील ९४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यातील ८६ विद्यार्थी पास झाले आहेत.
१४ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविले
उत्तीर्णांमध्ये १४ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविले आहे. प्रथम श्रेणीत ४० द्वितीय श्रेणीत – २६,
उत्तीर्ण श्रेणी- ०६ विद्यार्थी आहेत.
यामध्ये विद्यालयातील प्रथम पाच आलेले विद्यार्थी
प्रथम अनुष्का राजू दुथडे ८६.२० टक्के, द्वितीय आदिती नवनाथ कुंजीर ८६ टक्के, तृतीय मानसी विजयकुमार कश्यप ८१.६० टक्के, चतुर्थ राजनंदिनी तानाजी उमाप ८१.४० टक्के, व समीक्षा महादेव वाघमारे ८०.२० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.
दरम्यान, विद्यार्थांना मार्गदर्शन करणारे प्राचार्य कल्पना मुखवटे, पर्यवेक्षिका सुवर्णा सावंत, कार्याध्यक्ष अरुण घुले यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. (Loni Kalbhor) व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.