Baramati News : बारामती, (पुणे) : बारामती तालुक्यातील जळगाव सुपे ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचांच्या दोघांनी चारचाकी गाडी घालत जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली आहे. सोमवारी (ता. २२ मे) हि घटना घडली आहे. या प्रकरणी दोघांविरोधात माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Attempt to Kill lady sarpanch by hitting a four-wheeler)
कौशल्या मोहन खोमणे (रा. जळगाव सुपे, ता. बारामती) असे महिला सरपंचांचे नाव आहे. तर संदीप रमेश खंडाळे आणि अमोल दत्तात्रय जगताप अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
बारामतीसह परिसरात खळबळ..
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कौशल्या खोमणे या २०२१ पासून जळगाव सुपे ग्रामपंचायतीच्या सरपंच आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत संदीप खंडाळे यांनी (Baramati News) अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. खंडाळे आणि जगताप हे दोघे खोमणे सरपंच झाल्यापासून कोणत्या ना कोणत्या कारणावरून त्यांना त्रास देत होते. तसेच प्रशासनालाही वेठीस धरण्याचा प्रकार सुरू होता.
सोमवारी २२ मे रोजी खोमणे यांच्या शेतात शेंगा झोडण्याचे काम सुरू होते. तेथे गावातील छाया सदाशिव सातपुते, रोहिणी संभाजी करे यादेखील काम करत होत्या. (Baramati News) करे यांनी खोमणेंकडे येत खंडाळे आणि जगताप हे दोघे चारचाकीतून आले असून, घराचे आणि शेडचे फोटो काढत असल्याचे सांगितले.
खोमणे सदर ठिकाणी पोहचले व त्यांनी जाब विचारला. यावेळी दोघेजण गाडीत बसून निघून जाऊ लागले. जगताप हा गाडी चालवत होता. तर, खंडाळे शेजारी बसला होता. (Baramati News) या प्रकारानंतर खोमणे घराकडे परतत असताना पाठीमागून गाडीचा जोरात आवाज आला. त्यांनी मागे वळून पाहिले असता त्यांच्याच दिशेने गाडी जोरात येताना दिसली.
दरम्यान, प्रसंगावधान राखत त्या घरात पळाल्या. तेव्हा या दोघांनी “तू परत रस्त्यावर दिसल्यास गाडीखालीच घालतो”, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे. (Baramati News) त्यानुसार पोलिसांनी जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दोघांवर दाखल केला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Baramati News : बारामतीत कार आणि बाईकच्या अपघातात २६ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू