गणेश सूळ
Daund News : केडगाव : शासन आपल्या दारी व महाराजस्व अभियानाचा दौंडकरांनी लाभ घेतला आहे. या योजनेंतर्गत नागरिकांना विविध दाखले वाटप करण्यात आले आहेत. (Daundkars took advantage of the shashan aapalya Dari and Maharajswa Abhiyaan)
आमदार ॲड राहुल कुल यांच्या हस्ते उद्घाटन
लोककल्याणकारी कार्यक्रमाचे आयोजन रामकृष्ण मंगल कार्यालय (दौंड पाटस रोड,) येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन दौंडचे आमदार ॲड राहुल कुल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. मिनाज मुल्ला, तहसीलदार अजित दिवटे, (Daund News)नगर परिषद चे मुख्य अधिकारी संतोष टेंगले, गटविकास अधिकारी अजिंक्य येळे आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार कुल म्हणाले की, ”मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून शासन आपल्या दारी व महाराजस्व अभियान राबविण्यात आले आहे. या उपक्रमाचा लाभ अधिकाऱ्यांनी शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत देण्याचा प्रयत्न करावा. (Daund News)शासन आपल्या दारी हा उपक्रम अंतर्गत एकाच छताखाली नागरिकांना वेगवेगळे लाभ मिळावेत. व लाभार्ध्याचा वेळ ही वाचेल हा सरकारचा मानस आहे.”
केंद्र सरकार व राज्य सरकारच्या खूप योजना सुरू आहेत. त्या गरजू नागरिकांपर्यंत पोहचवा अशा सूचना दिल्या. अधिकाऱ्यांनी देखील त्यांच्या कडे असलेली कामे आठ दिवसात निपटावी व कामकाज गतिमान होईल. याची काळजी घ्यावी. असेही आमदार कुल यांनी सांगितले आहे.
उपविभागीय अधिकारी डॉ. मिनाज मुल्ला म्हणाले की, दौंड तालुका शहर व ग्रामीण भागातील सर्व सामान्य शेतकरी, बेरोजगार युवा तरुण तरुणींनी, ज्येष्ठ नागरिकांना या शासकीय योजनांचा लाभ मिळावा. यासाठी शासकीय योजनांची जत्रा भरवण्यात आली होती. (Daund News) असे मुल्ला यांनी सांगितले.
यावेळी प्रेमसुख कटारिया, नंदु पवार माऊली ताकवणे, गणेश जगदाळे व सर्व शासकीय विभाग अधिकारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : नाथाचीवाडी येथील माटोबा विद्यालयात तब्बल २२ वर्षानंतर पुन्हा भरली आठवणींची शाळा”
Daund News : शेतकरी हवालदिल! टोमॅटो पिकाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी