Shirur News : शिरूर : शिरूर येथे बायकोला शिवीगाळ केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या लहान भावावर कुऱ्हाडीने वार करणाऱ्या बाप लेकाला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने ७ वर्षाची सक्तमजुरी व प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा आज बुधवारी (ता.३१) ठोठाविली आहे. हे आदेश न्यायाधीश के.पी. नांदेडकर यांनी दिलेले आहेत. (7 years imprisonment for father and son who stabbed younger brother with axe)
किसन सुखदेव दुर्गे (वय-६०) व माधव किसन दुर्गे (रा दुर्गे वस्ती निमोणे, ता. शिरूर जि. पुणे) अशी शिक्षा ठोठावण्यात आलेल्या बाप लेकांची नावे आहेत. तर बाळासाहेब सुखदेव दुर्गे असे हल्ल्यात जखमी झालेल्या लहान भावाचे नाव आहे. याप्रकरणी ताराबाई सुखदेव दुर्गे यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
११ वर्षांनंतर लागला निकाल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना दोन मुले आहेत. त्यांच्या मोठ्या मुलाचे नाव किसन दुर्गे व लहान मुलाचे बाळासाहेब दुर्गे आहे. फिर्यादी यांचा लहान मुलगा बाळासाहेब दुर्गे यांची पत्नी २०१२ साली सामाईक रानात गुरे चारण्यासाठी गेल्या होत्या. (Shirur News) तेव्हा आरोपी किसन दुर्गे आणि सून यांच्यात गुरे चारण्यावरून वाद झाले. या वादात आरोपी किसन दुर्गे याने भावजयला शिवीगाळ गेली.
दरम्यान, पत्नीला शिवीगाळ केल्याचा जाब विचारण्यासाठी बाळासाहेब दुर्गे हे आरोपी किसन दुर्गे यांच्याकडे गेले होते. तेव्हा जाब विचारताना पुन्हा दोन्ही भावंडांमध्ये जोरदार भांडणे झाली. (Shirur News) हे भांडणे सुरु असताना, पुतण्या माधव हा घरातून कुऱ्हाड घेऊन आला आणि चुलत्यावर कुऱ्हाडीने वार केले. या हल्ल्यात बाळासाहेब हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
याप्रकरणी ताराबाई दुर्गे यांनी शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी आरोपी किसन दुर्गे व माधव दुर्गे यांना अटक केली होती.
या गुन्ह्याचा खटला शिवाजीनगर येथील जिल्हा सत्र न्यायालयात सुरु होता. या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. एम. बी. वाडेकर यांनी केलेले युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी किसन दुर्गे व माधव दुर्गे या बापलेकाला ७ वर्षाची सक्तमजुरी व प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठाविली आहे. हे आदेश न्यायाधीश के.पी. नांदेडकर यांनी दिले आहेत. (Shirur News)
दरम्यान, या खटल्यात सरकारी वकील ॲड. एम. बी. वाडेकर यांना शिरुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, पोलीस निरीक्षक ए बी जगदाळे, (Shirur News) सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडेपाटील, सहाय्यक फौजदार विद्याधर निचीत,महिला पोलीस कर्मचारी रेणुका भिसे आणि पोलीस अंमलदार एस बी रणसर यांची मदत मिळाली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : शेतकऱ्याचा नादच खुळा ! फॉर्च्युनरमधून घेऊन आला घोडीला, Video Viral
Shirur news : बेट भागातील शाळांमधून बारावीच्या निकालाची टक्केवारी घसरली