अजित जगताप
Waduj News : वडूज : आपल्या भारत देशाचे नाव उज्वल करण्यासाठी क्रीडक्षेत्रातील मैदानावर आपल्या खेळातून प्राविण्य मिळवणारे भारत देशाचे सात कुस्तीगीर यांचे लैंगिक शोषण झालेले आहे. असा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे बेटी बचाव बेटी पढाव असा निर्णय देणाऱ्या भाजपने शोषणकर्त्या भाजप खासदार ब्रजभूषण चरणसिंह यांच्या पाठीशी ठाम राहिल्यामुळे तमाम मुली व महिला वर्गाचा अवमान झाला आहे. त्याचा निषेध करण्यासाठी शिवाजी चौक, वडूज येथे निदर्शने करून खटाव तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. (Athletes protest in Vaduj Nagar to arrest accused against seven women wrestlers exploitation)
दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानामध्ये लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या खेळाडू, महिलांना अक्षरशा पोलिसांनी फरपटत घेऊन गेले. (Waduj News) लोकशाहीची कुठली पाळीमुळे भाजप पक्षाने ठेवलेले नाहीत तर दुसऱ्या बाजूला धार्मिक संसद भवनच्या उद्घाघाटनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्यस्त होते.
खटाव तालुक्यातील सर्व खेळाडू एकवटले
एका बाजूला लोकशाहीचे गोडवे गायचे. दुसऱ्या बाजूला हुकूमशाही बघण्यात मिळाली. याचा संपूर्ण देशभर निषेध होत आहे. (Waduj News) क्रांतिकारी एक पिढी असलेल्या खटाव तालुक्यातील वडूज नगरीमध्ये आज भर उन्हात भाजपच्या खासदार शरण सिंह याचा निषेध करण्यासाठी खटाव तालुक्यातील सर्व खेळाडू एकवटले होते . यावेळी तहसिलदार किरण जमदाडे यांनी निवेदन घेतले.
आज भाजप केंद्र सरकारचा अख्यात्यारीत असून त्याचा धिक्कार करण्यात आला. खा. सिंह यांचा धिक्कार असो … अशा घोषणाबाजी करून निदर्शकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. (Waduj News) यावेळी खेळाडू व महाराष्ट्र केसरी धनाजी फडतरे, बापूसाहेब माने, अमीन मुल्ला, प्रमोद राऊत, चंद्रकांत गोडसे, प्रदीप पवार ,अमोल फडतरे ,अर्जुन पाटील, उमेश पाटील, संतोष मांडवे, अक्षय घाडगे, वैभव माने, अमोल साळुंखे ,प्रवीण गोडसे, सनी जाधव, समर्थ झिमरे,रेवेदिका बेंडे , साक्षी गुरव, रूषाली पाटोळे, शरयू डोंगरे, समृध्दी इंगोले, रूपाली पाटोळे, आर्या बागल, वेदिका शिंगाडे, शर्वरी पाटोळे, चैत्राली शिंगाडे व खटाव तालुक्यातील खेळाडू मुली, मुले उपस्थित होते.
त्याच बरोबर सामाजिक कार्यकर्ते परेश जाधव, आबासाहेब भोसले, संतोष दुबळे, सुरेश लंगडे, राम कुलकर्णी यांच्यासह राजकीय नेते रणजितसिंह देशमुख, डॉ महेश गुरव, शहाजीराजे गोडसे, श्रीमती शशिकला देशमुख, ,विजयकुमार शिंदे, इम्रान सिकंदर बागवान, राजू फडतरे, अक्षय थोरवे, अजित साठे अमरजीत कांबळे, तानाजी वायदंडे, डॉ. संतोष गोडसे,, (Waduj News) आनंदा साठे, सुरेश पवार, राहुल सजगणे, क्रीडा शिक्षक आर एन पवार व अनेक क्रीडा प्रेमी कुस्तीगीर तसेच राजकीय अभ्यासक धनंजय चव्हाण, लालासाहेब माने, आदी मान्यवर उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Waduj News : खटाव तहसीलदारांच्या प्रयत्नाने रस्त्याचा वाद सामोपचाराने मिटला
Satara Political News : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये सातारा जिल्ह्याला झुकते माप मिळणार ??
Satara News | फांदीने साथ सोडली पण पारंब्याने हात दिला…