विशाल कदम
Loni Kalbhor News : लोणी काळभोर : जगातील २० प्रमुख देशांचे शिक्षणमंत्री पुण्यात येणार आहेत. त्यांचा १९ ते २१ जून या दरम्यान पुण्यात दौरा आहे. या तीन दिवसात ते उरुळी कांचन, वळती सह हवेली तालुक्यातील १२ शाळांपैकी एका शाळेला भेट देऊन पाहणी करणार आहेत. (G20: Education Ministers of 20 major countries of the world will come to Pune on this day; Uruli Kanchan will visit one of the 12 schools in Haveli taluk along with Valti)
जी-२० हा जगातील २० प्रमुख देशांच्या अर्थमंत्री व मध्यवर्ती बँकेच्या गव्हर्नरांचा एक गट आहे. वास्तविकपणे ह्या गटात १९ देश व युरोपियन संघाचा सहभाग आहे. (Loni Kalbhor News) युरोपीय परिषदेचे अध्यक्ष व युरोपीय मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष युरोपियन संघाचे जी-२० मध्ये प्रतिनिधित्व करतात.
जी – २० प्रमुख देशांचे शिक्षणमंत्री येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर हवेली तालुक्यातील शाळांनी G20 साठी तयारी करावी. तसेच यादीतील शाळांनी शालेय स्वच्छता, फलक लेखन, तक्ते, भौतिक सुविधा दुरुस्ती करून घ्यावी. (Loni Kalbhor News) अशा सूचना हवेलीचे गटशिक्षणाधिकारी यांनी संबंधित शाळांना दिल्या आहेत.
हवेली तालुक्यातील शाळांची नावे पहा
शाळांची यादी खालीलप्रमाणे
१) महात्मा गांधी विद्यालय उरुळी कांचन,
२) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वळती,
३) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेवाळवाडी,
४) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खानापूर,
५) बी.जे. हायस्कूल वाघोली,
६) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणी कंद,
७) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लाडबापडळ
८) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बहुली,
९) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोणजे,
१०) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडकवासला नं.१,
११) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडकवासला नं.२,
१२) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तारमळा,
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Loni Kalbhor News : लोणी काळभोर येथील एका २० वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या