Whatsapp’s new feature : पुणे : व्हॉट्सॲप नेहमीच आपल्या युजर्ससाठी दरवेळी नवीन फिचर आणत असते. व्हॉट्सॲपने आता एक नवीन घोषणा केली आहे. व्हॉट्सॲपचे मेसेजेस आता पाठवल्यानंतर १५ मिनिटांपर्यंत एडिट करता येणार आहेत. (WhatsApp new feature, sent message can be ‘edited’)
काय आहे नवीन फिचर
व्हॉट्सॲपवर पाठवलेला मेसेज १५ मिनिटांच्या मर्यादेत एडिट करता येईल. युजरला मेसेज एडिट करण्यासाठी पाठवेल्या मेसेजवर प्रेस करुन होल्ड करावं लागेल. (Whatsapp’s new feature) त्यानंतर पुढे एक एडिट ऑप्शन दिसेल. त्याद्वारे पाठवलेला मेसेज एडिट करता येईल.मात्र एडिट केलेल्या मेसेजला ‘Edited’ असा टॅग लागणार आहे. त्यामुळे मेसेज वाचणाऱ्याला हा मेसेज एडिट केलेला आहे, हे लक्षात येईल. पण मेसेजमध्ये नक्की काय बदल केला हे दिसून येणार नाही.
ही सुविधा प्रतिस्पर्धी टेलिग्राम किंवा सिग्नलसारख्या ॲपला टक्कर देण्यासाठी ही घोषणा करण्यात आली आहे. (Whatsapp’s new feature) टेलिग्राम, सिग्नल ॲपवर ही सुविधा पूर्वीपासूनच आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune ZP News : काम नाकारणार्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याचा जिल्हा परिषदेचा इशारा