Two Thousand Rupees Note : २०१६ मध्ये, जेव्हा २ हजारच्या नोटेची घोषणा करण्यात आली तेव्हा या नोटेच्या रंगाची सर्वाधिक चर्चा झाली होती. आता या दोन हजार रुपयांच्या नोटेची छपाई बंद करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. यामुळे नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. (Two Thousand Rupees Note) दोन हजार रुपयांची नोट जवळ असेल तर तिचे काय करावे हा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र याविषयीही रिझर्व्ह बँकेने इतर बँकांना सचूना देत माहिती जारी केली आहे. जाणून घ्या तुमच्याजवळ २००० रुपयांची नोट असेल तर काय करावे -(2000 rupees note back from currency, if you have 2000 rupees note do ‘this’)
नोटा बदलून घेण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी
२०१८-१९ मध्येच २००० रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली होती. नागरिकांना २००० रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी आहे.(Two Thousand Rupees Note)
नोट बँक खात्यात जमा करावी
ज्या नागरिकाकडे ही नोट असेल त्याने आपल्या बँक खात्यात ती जमा करावी. किंवा बँकेत जाऊन २००० रुपयांची नोट बदलवू शकता. (Two Thousand Rupees Note) कुठल्याही बंधनांशिवाय सामान्यपणे ही नोट बँक खात्यात खातेदार जमा करू शकतो.
नोट बदलवण्याची मुदत –
२००० रुपयांची नोट बदलवण्याची मुदतही रिझर्व्ह बँकेने दिली आहे. ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत बँकांना २००० रुपयांची नोट जमा करता येईल किंवा बदलवून देता येईल. (Two Thousand Rupees Note) २ हजार रुपयांची नोट बदलवण्याची मुदत ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत असली तरी ही नोट चलनात कायम राहणार आहे.
एकावेळी फक्त २० हजार रुपयेच जमा करता येणार –
२३ मेपासून म्हणजे येत्या मंगळपासून ही नोट नागरिकांना बँकेत जाऊन बदलवता येणार आहे. (Two Thousand Rupees Note) पण बँकेतील व्यवहार सुरळीत ठेवण्यासाठी सध्यातरी एकावेळी फक्त २० हजार रुपयेच जमा करता येणार आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News | आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून घातला कोट्यवधीचा गंडा…