लोणी काळभोर, (पुणे) : हडपसर-सासवड महामार्गावर गोदामाची भिंत फोडून अज्ञात चोरट्यांनी साडेबारा लाखांच्या वाईनच्या बाटल्यांची खोकी पळवून नेल्याची घटना मंगळवारी (ता. ०९) सकाळी उघडकीस आली आहे.
याप्रकरणी संतोष केशवे (वय ३३, रा. शेवाळवाडी) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, हडपसर -सासवड रस्त्याच्या बाजूला केशवे यांचे श्रीनाथ एंटरप्रायजेस नावाचे गोडावून आहे. या गोडावूनमध्ये केशवे यांच्या गोदामांमध्ये विविध कंपन्यांच्या मालाची साठवणूक केली जाते. त्याच गोदामात केशवे यांच्या गोदामात विविध कंपनीच्या वाईनची खोकी ठेवण्यात आली होती. चोरट्यांनी गोदामाची भिंत मध्यरात्री फोडली व गोदामातील वेगवेगळ्या कंपनीच्या वाईनच्या बाटल्या खोक्यात ठेवण्यात आल्या होत्या.
चोरट्यांनी वाईनच्या बाटल्यांची खोकी पळविली. चोरट्यांनी १२ लाख ६५ हजारांचे बाटल्या लांबविल्या असल्याने या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच चोरट्यांनी गोदामातील सीसीटीव्ही चित्रीकरण साठविणारी डीव्हीआर यंत्रणा लांबविली असून सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे तपास करत आहेत.
दरम्यान, शहरात दुकानांची भिंत फोडून चोरी करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आठवड्यापूर्वी उंड्री भागातील एका सराफी पेढीची भिंत फोडून चोरट्यांनी ऐवज लांबविला होता. सासवड रस्त्यावरील गोदामाची भिंत फोडून वाईनच्या बाटल्या लांबविण्यात आल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे.