Bribe | सांगली : 2 लाख रुपयाची लाच घेतल्याप्रकरणी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यास एसीबीकडून रंगेहात पकडण्यात आले आहे. बिल्डरला 5 मजली अपार्टमेंटच्या बांधकामास परवानगी देण्यासाठी अडीच लाखाच्या लाचेची मागणी करत तडजोडीअंती दोन लाख घेतल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी सांगली जिल्ह्यातील विटा नगरपरिषदेचा मुख्याधिकारी एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे.
विनायक विजय औंधकर (47, रा. मुख्याधिकारी निवास, मायणी रोड, विटा) असे लाचखोर मुख्याधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी विटा पोलिस स्टेशन ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांच्याकडे मुख्याधिकारी औंधकर यांनी 5 मजली अपार्टमेंटच्या बांधकाम परवान्याची फाईल मंजूर करण्यासाठी अडीच लाख रुपयांची 16 मे रोजी मागणी केली. याबाबत व्यावसायिकाने एसीबीकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर अॅन्टी करप्शनने मिळालेल्या तक्रारीची पडताळणी केली.
त्यानंतर अॅन्टी करप्शनने सापळा रचला तेव्हा दोन दाख रुपयांची लाच घेताना मुख्याधिकारी औंधकर यांना रंगेहाथ पकडले. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!