हडपसर : हडपसर परिसरात असलेल्या लक्ष्मी कॉलनी येथील एंजल हायस्कूलच्या स्कूल बसला भीषण आग लागल्याची घटना आज मंगळवारी (ता.९) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. सुदैवाने शाळेला आज मोहरम सणाची सुट्टी असल्याने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र, या आगीत बस जळून खाक झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एंजल हायस्कूलच्यआवारामध्ये उभ्या असलेल्या बसला सकाळी अचानक आग लागली. या आगीची माहिती शाळेच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ काळेपडळ अग्निशामक दलाच्या जवानांना दिली.
या घटनेची माहिती मिळताच, काळेपडळ अग्निशामक दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या जवानांना बसला लागलेली आग आटोक्यात यश आले आहे. मात्र या आगीत शाळेची बस जळून खाक झाली आहे. आज मोहरम सणाची विद्यार्थ्यांना सुट्टी असल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र स्कूल बसला आग लागल्याचे कारण अद्यापही समजले नाही.
दरम्यान, हि आग विझविण्यासाठी काळेपडल अग्निशमन केंद्राचे प्रभारी अधिकारी अनिल गायकवाड,ड्रायवर-सौरोदे,फायरमन-चौधरी,दडस,कोंडगेकर आणि बिचकूले यांचे सहकार्य मिळाले.