Health | पुणे : शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी जलजिरा सरबत उपयुक्त आहे.
* जलजिरा सरबत पिण्याचे फायदे –
- पचनक्रिया सुधारते, वजन कमी होण्यास मदत करते : पुदिना आणि जिरे हे दोन्हीही पचनक्रिया आणि चयापचय क्रिया म्हणजेच मेटाबॉलिझम सुधारण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्यामुळे आपोआपच कॅलरी बर्न होऊन वेटलॉस करण्यासाठी जलजिरा उपयुक्त ठरतो.
- रोगप्रतिकारक शक्ती वाढते : लिंबू, पुदिना यामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी हे पेय फायदेशीर ठरते.
* जलजिरा सरबत बनविण्याची रेसिपी –
साहित्य
३ चमचे जलजिरा पावडर, सोडा वॉटर, २ चमचे वाटलेला पुदिना, १ चमचा चिरलेला पुदिना, अर्धा चमचा जिरे पूड, २ चमचे चाट मसाला, १ चमचा वाटलेलं आलं, मीठ, २ चमचे लिंबाचा रस
कृती
२ चमचे वाटलेला पुदिना, अर्धा चमचा जिरे पूड , ३ चमचे जलजिरा पावडर, २ चमचे चाट मसाला, १ चमचा वाटलेलं आलं, मीठ, २ चमचे लिंबाचा रस, १ चमचा चिरलेला पुदिना हे सारे एकत्र करून जार मध्ये एकत्र करून सोडा वॉटर आणि बर्फ घालून सर्व्ह करा.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Health | आनंदी राहण्यासाठी फक्त दहा मिनिटे ‘हे’ करा