Hadapsar | पुणे : पुणे शहरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. जन्मदात्या वडिलांची पोटच्या मुलाने हत्या केल्याची घटना शहरातील मांजरी बुद्रुक येथे घडली आहे. वडीलांनी दारूच्या नशेत शिवीगाळ केल्याचा राग मनात धरून या मुलाने काठीने मारहाण करून आणि गळा दाबून वडिलांचा खून केला. 9 मे रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
याप्रकरणी आरोपी मुलाची आई रेखा रवी क्षीरसागर (वय 43) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. रवी क्षीरसागर (वय 52, घुले पाटील कॉलनी मांजरी रेल्वे गेट जवळ मांजरी बुद्रुक) असे खून झालेल्या पित्याचे नाव आहे. ओंकार रवी क्षीरसागर (वय 27) आरोपी मुलाचे नाव असुन याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याला व पोलीसांनी त्याला अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पती रवी हे चप्पल शिवण्याचे काम करत होते. त्यांना दारूचे व्यसन होते. आरोपी मुलगा ओंकार हा काही काम करत नाही म्हणून वडिल दारूच्या नशेत शिवीगाळ करत होते. याचा राग आरोपी मुलाच्या मनात होता.
त्यातून त्याने काठीने मारहाण करून आणि गळा दाबून त्यांचा खून केला. खून केल्यानंतर आरोपी निघून गेला. फिर्यादी यांनी पती निपचित पडून असल्याचे दिसल्यावर त्यांनी त्यांना रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी मयत झाल्याचे जाहीर केले. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Pune Crime : चिकन सेंटर चालकाने २०० रुपये देतो अशी बतावणी करून अल्पवयीन मुलीवर केले ते चाळे