Pimpri News | पिंपरी : लग्न झाल्यापासून विवाहितेला छोट्या छोट्या गोष्टींवरून बेल्टने मारहाण करण्यात आली. तसेच दिराने घरामध्ये जबरदस्तीने १५० उठाबशा काढायला लावल्या. या छळात पतीने देखील साथ दिली असल्याचा धक्कादायक प्रकार उडकीस आला आहे.
या प्रकरणी महिलेने देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी पतीसह, दीर आणि दोन महिलांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २६ डिसेंबर २०२१ ते मंगळवारी (दि.९) या कालावधीत आदर्शनगर येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे लग्न झाल्यापासून आरोपींनी फिर्यादीसोबत वाद घालून तिला लाथाबुक्क्या तसेच कमरेच्या बेल्टने मारले. तसेच आरोपींनी फिर्यादीचा गळा दाबून दिला जीवे मारण्याचे देखील प्रयत्न केला.
फिर्यादीला मानसिक तसेच शारिरीक त्रास देत आरोपी दिराने जबरदस्तीने घरात १५० उठाबशा काढायला लावल्या, असे फिर्यादीत नमूद आहे.