Junner News | पुणे : जुन्नर तालुक्यातील दळणवळणाचे मुख्य ठिकाण जुन्नर बस स्थानकात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मात्र प्रशासनाने डोळेझाक केली जात आहे.
पुणे, ठाणे, नारायणगाव, मुंबई, औरंगाबाद, अकोले, घोडेगाव, पंढरपूर, बारामती तसेच इतर विविध ठिकाणावरून प्रवाशांची जुन्नर बसस्थानकात वर्दळ असते. जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका असून या ठिकाणी महाराष्ट्रातून असंख्य पर्यटक येत-जात असतात.
स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर…
त्यामुळे बसस्थानकात येणाऱ्या पर्यटकांना या ठिकाणच्या घाणीचा, दुर्गंधीच्या वासाचा त्रास सहन करावा लागतो. तसेच डासांमुळे पर्यटक व स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
तसेच बसस्थानक परिसर धुळीच्या साम्राज्यात पहावयास मिळत आहे, याकडेदेखील प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!