Crime News | दौंड : यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यातील आठ गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. परिसरात गुन्हेगारांवर आळा बसविण्यासाठी पोलीसांनी कारवाईचा बडगा उचलला आहे.
यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मानकोबावाडा येथील हे गुन्हागार असून यांना पुणे, पिंपरी चिंचवड सातारा जिल्ह्यातून 6 महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे. याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली आहे.
अक्षय लालु लकडे , शुभम बाळु लकडे, बाळु उर्फ भाउ आबा लकडे, विशाल नंदु खताळ, सागर ठकु खताळ, खंडु धनाजी ठोकळे, रोहित गोपिनाथ गवळी (सर्व रा. मानकोबावाडा यवत ता दौंड जि. पुणे ) तसेच व गौरव नामदेव अवचर (रा. उरुळी कांचन ता हवेली जि.पुणे) असे तडीपार केल्या सराईतांची नावे आहेत.
परिसरात दहशत माजवणे, मारहाण करणे, सामान्य नागरिकामध्ये दहशत माजवने यासह या टोळीकडून गंभीर स्वरुपाचे गुन्हेगारी कृत्य करण्यात येत होते. यवत पोलीस ठाण्यात या टोळक्याविरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत.
या टोकळ्यावर अनेक वेळा गंभीर गुन्हे दाखल करून सुद्धा आळा बसत नव्हता शेवटी यांना आवर घालण्यासाठी तडीपार करण्यात आले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Daund Crime : दौंडमधील गोहत्या करणाऱ्या टोळीवर तडीपारीची कारवाई
Daund Crime : दौंड तालुक्यातील देवकरवाडीतील दोन गुऱ्हाळचालकांवर वीजचोरी प्रकरणी गुन्हा दाखल..