हडपसर : हडपसर परिसरात घरफोड्या व गाड्यांची चोरी करणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना हडपसर पोलिसांनी तुळजापूर (जि. उस्मानाबाद) येथून ताब्यात घेतले आहे.
जितसिंग ऊर्फ जितुसिंग राजपालसिंग टाक (वय-२६ रा. ११२ बिराजदारनगर, वैदुवाडी, हडपसर) व लकिसींग गब्बरसिंग टाक (वय -१९, रा. रामटेकडी डोंगरावर पाण्याचे टाकीजवळ हडपसर) असे ताब्यात घेण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी सोन्याचे दागिने, व एक चारचाकी गाडी असा ११ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखा युनिट-५ च्या पोलिसांनी अक्षयसिंग बिरूसिंग जुनी वय -१९, रा. बिराजदारनगर वैदुवाडी, हडपसर यास ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याला तपास कमी हडपसर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. यावेळी वरील दोन आरोपींना चौकशीसाठी न्यायालयाच्या परवानगीने वर्ग करून घेवून उस्मानाबाद कारागृहातुन जीतसिंग व लकिसींग यांना ताब्यात घेतले.
त्यानुसार आरोपी अक्षयसिंग जुनी याला न्यायालयाने १० दिवसांची पोलीस कोठडी सुनवली होती. त्यानुसार आरोपी जीतसिंग व लकिसींग यांना ६ दिवसांची रिमांड कोठडी देण्यात आली होती. त्यानुसार हडपसर पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सोन्या-चांदीचे तसेच चोरीची एक चारचाकी गाडी चोरी केल्याची माहिती पोलिसांना दिली. तपासपथकाने आजपर्यंत सोन्याचे दागिने आणि चार चाकी गाडी असा एकुण ११ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरची कामगिरी हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, गुन्हे पोलीस निरीक्षक दिगंगर शिंदे, विश्वास डगळे, यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार, सुशील लोणकर, अविनाश गोसावी, संदीप राठोड, अंकुश बनसुडे, सचिन जाधव, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे, सचिन गोरखे, सुरज कुंभार, भगवान हंबर्डे, अनिरूध्द सोनवणे, अतुल पंधरकर यांचे पथकाने केली आहे.