Accident | पुणे : शहरातील वाकडेवाडी बस स्थानकाजवळ भला मोठा कंटेनर पलटी झाल्याची बातमी समोर आली आहे. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर हा कंटेनर पटली झाल्यामुळे या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.
कंटेनर पलटी झाल्याची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी वाहतूक पोलिसांनी धाव घेतली. व वाहतूक सुरळीत केली. प्राथमिक माहितीनुसार पलटी झालेला कंटेनर हा मेट्रोचा आहे.
याबाबत वाहतूक पोलीसांनी सांगितले की, जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील वाकडेवाडी एसटी स्टँड येथे कंटेनर पलटी झाला असून एका लेनमधून दुहेरी वाहतूक चालू करण्यात आलेली आहे. क्रेन बोलवून कंटेनर बाजूला करून घेण्याचे काम चालू आहे, वाहन चालकांना विनंती आहे त्यानुसार आपले प्रवासाचे नियोजन करावे. असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.