हडपसर : घरगुती वादातून स्वत:वर गोळी झाडून २५ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना हडपसर येथील भागीरथी नगर परिसरात रविवारी (ता.७) रात्री पावणे नऊच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेमुळे हडपसर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
विशाल तोडकर (वय-२५, रा. भागीरथी नगर, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल तोडकर हा पत्नी आणि आई सोबत राहत होता. त्याचे कपड्याचे दुकान आहे. मागील काही दिवसांपासून विशालचे घरात सतत वाद होत असायचे, त्यातून विशालने रविवारी (ता.७) रात्री पावणे नऊच्या सुमारास आत्महत्या केली आहे
दरम्यान, विशाल तोडकर याचे एका तरुणी सोबत प्रेम संबध असल्याने कुटुंबियांसोबत वाद होत होते. त्यातूनच विशालने आत्महत्या करण्याचे पाऊल उचल्याची देखील प्राथमिक माहिती मिळत आहे. परंतु, विशालच्या आत्महत्या करण्याचे कारण नेमके पोलीस तपासातून पुढे येईल, तसेच त्याच्याकडे गावठी पिस्तूल कशी आली. याचा देखील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.