राहुलकुमार अवचट
यवत Yavat News : कचरामुक्त गाव अंतर्गत पुणे जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद टोणपे आज यवत येथे भेट देऊन अभियानाची सुरुवात करण्यात आली. (Yavat News) जिल्हा परिषदेच्या पुढाकाराने पुणे जिल्ह्यात कचरामुक्त गाव ही विशेष मोहीम (Yavat News) यवत (ता. दौंड) येथे सुरु केली आहे. (Yavat News) या मोहिमेची सुरवात महाराष्ट्रदिनी करण्यात आली आहे. (Yavat News)
जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन सुरु
या मोहिमेअंतर्गत गावांच्या परीसरातील, रस्त्याच्या कडेला व अडगळीच्या ठिकाणी वर्षानुवर्षे साठलेला कचरा आणि प्लास्टिक कचरा जमा केला जाणार असून घनकचरा व्यवस्थापनासाठी जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत गावस्तरावर कचरा प्रक्रिया प्रकल्प केंद्र सुरु करण्यात येणार आहे.
दरम्यान, कचरामुक्त गाव मोहिमेबरोबरच ग्रामपंचायत स्तरावर घनकचरा व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करून गावात कायमस्वरूपी सार्वजनिक स्वच्छता ठेवण्याचे नियोजन केले जाणार आहे. गावस्तरावर सार्वजनिक ठिकाणे, बाजार मैदान, बस स्थानके, मंदिरे, आदि ठिकाणी मोठया प्रमाणात कचरा साठलेला दिसून येतो उघड्यावर साठलेल्या कचऱ्यामुळे आरोग्यास व पर्यावरणास धोका निर्माण होऊ शकतो यावर उपाययोजना करण्याच्या उद्देशाने ही कचरामुक्त गाव मोहीम सुरु केली आहे.
या मोहिमेच्या अंतर्गत उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद टोणपे यांनी दौंड तालुक्यातील यवत,भांडगाव, वरवंड व खुटबाव या चार ग्रामपंचायतींना भेट देऊन गावातील स्वच्छतेचा आढावा घेतला. या ग्रामपंचायतींमध्ये अनेक कंपन्या असल्याने या परिसरात मोठ्या संख्येने कामगार राहत असल्याने कचरा मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद येणार असल्याने यवत परिसरात मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली होती. सकाळी मंदिर परिसर, बाजार तळ पाहणी करून परिसरात गेले असता त्या ठिकाणी कचरा व प्लास्टिक पाहून मिलिंद टोणपे यांच्यासह गट विकास अधिकारी अजिंक्य येळे, सरपंच समीर दोरगे, उपसरपंच सुभाष यादव, विस्तार अधिकारी बाबा मुलाणी, विस्तार अधिकारी विद्याधर ताकवणे यांसह अंगणवाडी सेविका यांनी स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घेतला.
ही मोहीम फक्त प्रशासनाने राबवणे आवश्यक नसून यामध्ये ग्रामस्थांनी देखील सहभाग होणे आवश्यक आहे, ग्रामस्थ, महिला, पुरुष, शालेय विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी व्हायला हवे असे आवाहन यावेळी करण्यात आले लोकसहभाग आणि श्रमदानातून कचऱ्याचे संकलन करून जिल्हा पातळीपासून गाव पातळीपर्यंत सरपंच, ग्रामसेवक, कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी व गट विकास अधिकारी यांचेकडून अंमलबजावणी केली जाणार असून मोहिमेच्या यशस्वितेसाठी श्रमदानाद्वारे रस्ते, गटारे, नाले सफाई व कचरा संकलन केले जाणार आहे
रस्त्याच्या बाजूने कचरा टाकला जाणाऱ्या ठिकाणी कचराकुंडी ठेवणे, कचरा निर्माण होत असलेल्या ठिकाणीच कचऱ्याचे ओला – सुका वर्गीकरण करणे, गावातील प्रत्येक घरासमोर कचरा संकलन वाहन पोहोचण्याचे नियोजन करणे गावातील दर्शनी भागात कचरागाडी येण्याच्या वेळेसह मार्ग निश्चित दर्शवणारे फलक लावणे गावातील परिसर प स्वच्छ ठेवण्यासाठी आवश्यकतेनुसार वेळोवेळी झाडलोट करावी.
यावेळी ओढ्यात सफाई करणे, शक्य असल्यास बंदिस्त करणे याबाबत चर्चा केली, परिसरातील प्लास्टिकचा साठा पाहून पोलीस प्रशासनाच्या मदतीने प्लास्टिक वापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी यासह बाजार दिवशी कचरा ओढ्यात जाणार नाही यासाठी नेट बांधण्याची व्यवस्था करण्यात यावी अशा सूचना ग्रामपंचायत प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद टोणपे यांनी प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन, प्लास्टिक कचरा संकलित करणे, प्लास्टिक उचित व्यवस्थापन, घनकचरा वर्गीकरण आदी बाबत व या योजनेबद्दलची माहिती उपस्थितांना देत नागरिकांनी देखील ओला सुका कचरा वेगळा करून घंटागाडीतच कचरा टाकावा तसेच आपला परिसर स्वच्छ ठेवू ग्रामपंचायत तिला सहकार्य करावे असे आवाहन केले.
यवतचे उपसरपंच सुभाष यादव यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत व आभार व्यक्त करून यवत ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने कचरामुक्त गाव अभियान राबवण्यासाठी सर्व सहकार्य केले जाईल अशी ग्वाही दिली यावेळी चंद्रकांत दोरगे यांनी बाजार दिवशी येणाऱ्या अडचणी सांगितल्या असता यावर लवकर मार्ग काढला जाईल अशी ग्वाही सरपंच समीर दोरगे यांनी दिली.
यवत येथे घनकचरा प्रकल्पासाठी उपलब्ध असल्याची जागेची पाहणी करण्यात आली यावेळी प्रकल्पासाठी जागा उपलब्ध असून लवकरात लवकर येथील प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रशासनाची व ग्रामपंचायतची तयारी असल्याचे गटविकास अधिकारी अजिंक्य येळे व सरपंच समीर दोरगे यांनी सांगितले.
याबाबतच्या सूचना पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद टोणपे यांनी संबंधितांना लवकरात लवकर यवत येथील प्रकल्प सुरू करण्यासाठी आवश्यक ती सर्वपूर्तता करावी अशा सूचना दिल्या. यावेळी पंचायत समितीचे ग्रामीण पुरवठा उप अभियंता पवार, महिला व बालकल्याण अधिकारी धुमाळ , शिक्षण विभागाचे अधिकारी रोकडे, बाबर ,जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी उज्वला जाधव , ग्रामीण पाणीपुरवठा कनिष्ठ अभियंता दिवेकर, ग्रामसेवक बबन चखाले , जिल्हा परिषदेचे अधिकारी , पंचायत समितीचे अधिकारी , ग्रामपंचायत सदस्य इम्रान तांबोळी, ग्रामपंचायत सदस्या मंदाकिनी कुदळे यांसह अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Yavat : यवत येथे जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी..!