Pimpri Crime पिंपरी-चिंचवड : शहरातील हिंजवडी परिसरातून अघोरी कृत्याचा प्रकार समोर आला आहे. चहा बनवून देण्याचा बहाणा करत पतीने पत्नीच्या चहात काळ्या रंगाची उग्र वास येणारी राख टाकून जादूटोणा करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा हा डाव पत्नीचे हाणून पाडला. यानंतर मात्र पतीने महिलेला मारहाण केली. हा प्रकार हिंजवडी नजीकच्या एक्सारबिया गृहसंकुलातील एका घरात उघडकीस आला
याप्रकरणी २० वर्षीय पत्नीने पतीच्या विरोधात शिरगांव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून २७ वर्षीय पतीवर पोलीसांनी गुन्हा दाखल करून घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार…!
आरोपी पती हा मूळचा जुन्नर तालुक्यातील रहिवासी आहे, तर तक्रारदार पत्नी ही मावळ तालुक्यातील बेबड ओव्हळ येथील असून ती एक्सारबिया गृहसंकुलात राहते. फिर्यादी व आरोपी यांचे दोन वर्षापुर्वी लग्न झाले. मात्र काही दिवसांनंतर या दोघांचे खटके उडण्यास सुरुवात झाली. दोघांमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद होत असतं. यासह लग्नापूर्वीचे पतीचे प्रेमसंबंध अद्यापही सुरू असून, त्याने लग्नानंतर नोकरी सोडल्याचे उघड झाले होते. या कारणावरून वाद होत गेल्याने तक्रारदार पत्नी माहेरी निघून आली होती.
पत्नी पाठोपाठ आरोपी पती सुद्दा काही दिवसांसाठी पत्नीच्या माहिरी राहावयास गेला. त्याठिकाणी सुद्धा या दोघांमध्ये वाद झाले. जवळपास एक मार्च २०२२ ते ३० एप्रिल २०२३ या कालावधीत नवरा-बायकोमध्ये अनेकदा वाद झाले. दरम्यान रविवारी (३० एप्रिल) रोजी तुला चहा करून देतो म्हणत आरोपी पती स्वयंपाक घरात गेला.
त्यानंतर तो चहा करीत असताना पती चहात खिशातून काढलेल्या डबीतून काही तरी टाकत असल्याचे तक्रारदार पत्नीच्या लक्षात आले. त्यानंतर तिने पतीच्या हातातून डबी हिसकावून घेतली असता, पतीने तिला मारहाण केली.पतीने डबीतून काय आणले हे पत्नीने पाहिले असता, त्यात काळसर रंगाची आणि उग्र वास येणारी राख असल्याचे उघड झाले. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Pune Crime : ऑनलाइन मागवला मोबाईल अन् खोक्यात आल्या साबणाच्या वड्या ; तिघांना अटक
Pune Crime : रात्रीच्या वेळी मोबाईल हिसकाविणाऱ्या चोरट्यांना येरवडा पोलिसांनी ठोकल्या बेड्या..