Pune News पुणे : गरिबांना पोटापुरते खायला मिळावे, यासाठी सरकारने केवळ दहा रुपयांत जेवणाची योजना सुरू केली होती. मात्र आता या योजनेला उतरती कळा लागली असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात एकूण ९२ केंद्रांना मंजूरी देण्यात आली होती. ती आता बंद पडून लागली असून केवळ 38 केंद्रेच सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.
ग्रामीण भागातील ३७ केंद्रचालकांनी केंद्रे केली बंद
सुरुवातीच्या काळातील काही तांत्रिक अडचणी वगळता ती सुरळीत होती. कोरोना काळात वर्षाला होणारा सुमारे सात कोटींचा खर्च आता अवघ्या तीन कोटी रुपयांवर आला आहे. अशीच अवस्था राहिल्यास शिवभोजन केंद्र चालविणे कठीण जाणार असल्याने आतापर्यंत ग्रामीण भागातील ३७ केंद्रचालकांनी केंद्रे बंद केली आहेत. कोरोनाकाळात गरीब व गरजूंसाठी वरदान ठरणार्या शिवभोजन थाळी केंद्रासमोरील गर्दी आता ओसरायला सुरुवात झाली आहे.
जिल्ह्यात ७ हजार ४५०थाळी मंजूर असून, त्यातील ४ हजार४४५ थाळींचाच लाभ घेतला जात आहे. त्यामुळे केंद्रचालकांनी लाभार्थी येत नसल्याने केंद्र बंद करीत असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागात एकूण ९२ केंद्रे मंजूर होती. त्यातील ११ प्रशासनाने रद्द केली असून, ३७चालकांनी बंद केली. सध्या केवळ ३८ केंद्रे सुरू आहेत.
याबाबत बोलताना जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने म्हणाल्या, “ग्रामीण भागातील ३७ केंद्रे बंद करण्यात आली, तर अनियमितता आढळल्याने ११ केंद्रांचा परवाना रद्द करण्यात आला. सुरू असलेल्या केंद्रांवर पुरवठा विभागातील अधिकारी वेळोवेळी भेट देऊन पाहणी करतात.”
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा..
Pune News : शिव ऋण युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षय बोऱ्हाडे यांना जामीन मंजूर
Pune News : शिव ऋण युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षय बोऱ्हाडे यांना जामीन मंजूर