Solapur Crime बार्शी, (सोलापूर) : बार्शी-लातूर रस्त्यावर शहरात विक्रीसाठी विनापरवाना आणलेला ७६ लाख ७० हजार रुपयांचा गुटखा व २५ लाख रुपयांची ट्रक असा १ कोटी १ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून ६ जणांवर बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. २९) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
वाहन चालक अतिकमिया खुर्शिदमिया नाईकोडी (वय २९), जावेद पाशा अब्दुल सत्तार चेंगटा (वय ३५, दोघे रा. चुम्मनचोड, ता. चिंचोली, जि. गुलबर्गा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. वाहन मालक सद्दाम हुसेन अब्दुल सत्तार (रा.८३/२ मदिना कॉलनी, बसवकल्याण, बिदर, कर्नाटक), पुरवठादार गुलाम अली (रा. चुम्मनचोड), साठा मालक अभिद नाईक, इमरान नाईक (रा. कर्नाटक) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकारी प्रज्ञा सुरसे यांनी फिर्याद दाखल केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार..!
बार्शी-लातूर रस्त्यावर एमआयटी कॉलेज लगत ट्रक उभा असून त्यामध्ये गुटख्याच्या गोण्या भरलेला ट्रक उभा असल्याची माहिती पोलिसांना एका खबऱ्याकडून मिळाली होती. सदर ठिकाणी जाऊन पोलिसांनी जाऊन पाहणी केली असता दोघेजण ट्रकशेजारी उभे असल्याचे दिसून आले.
त्यांच्याकडे या ठिकाणी उभे का राहिले याबाबत चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी ट्रकची पाहणी केली असता त्यामध्ये ५९० गोण्या गुटखा भरलेला ७६ लाख ७० हजार रुपयांचा गुटखा मिळून आला.
दरम्यान, ट्रकमधील गोण्यांची तपासणी केली असता हिरा पानमसाला नाव असलेल्या ३९० गोण्या याची किंमत ५० लाख ७० हजार रुपये, तर रॉयल ७१७ नावाच्या सुगंधी तंबाखूच्या २०० गोण्या, याची किंमत २६ लाख रुपये आहे. पोलिसांनी २५ लाखांची किंमत असलेला ट्रक पोलिस ठाण्यात आणून जप्त केला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Solapur Crime | बार्शी येथे टेम्पोसहित २२ पोती ओला चंदन पकडला! दोन चंदन तस्करांना अटक