पुणे Pune Fire : पुणे-सातारा रस्त्यावरील नातूबाग बस स्थानक समोरील असलेल्या इंद्रनिल सोसायटीतील ४ दुकानांना सोमवारी ( ता.१) मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास भीषण आग (Pune Fire) लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. (Pune Fire) या आगीत चारही दुकाने जळून खाक झाली असून दोन जन गंभीर जखमी झाले आहेत. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. (Pune Fire)
आगीत २ जन गंभीर जखमी
या आगीत समीर कोलते व रस्त्यावरून जाणारा नागरिक गंभीर जखमी झाला आहे. तर देवयानी इलेक्ट्रॉनिक (दोन गाळे), गृहिणी किचन आणि देवयानी मोबाईल शाँपी असे जळून खाक झालेल्या दुकानांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी मध्यराञी १.३० वाजता आग लागल्याची माहिती अग्निशमन दल नियंत्रण कक्षाला देण्यात आली. माहिती मिळताच दलाकडून कात्रज, कोंढवा आणि सिंहगड रोड अग्निशमन केंद्राच्या मिळून ०६ फायरगाड्या ०२ वॉटर टँकर व ०१ रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान, अग्निशामक दलाच्या जवानांनी अथांग प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यास यश मिळविले. तसेच आगीत एक दुचाकी पुर्ण जळून खाक झाली होती. मात्र आगीचे निश्चित कारण अद्यापही समजू शकले नाही.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Fire : शिक्रापुर येथे कपड्याचे दुकान आगीत जळून खाक ; सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान…
हांडेवाडीतील इमारतीला लागलेल्या आगीत सात वाहने जळून खाक ; लाखोंचे नुकसान….!