पनवेल : अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपीला पनवेल सत्र न्यायालयाने सोमवारी (ता.१ ऑगस्ट) जामीन मंजूर केला असल्याची माहिती या खटल्यातील वकील अॅड. स्वरूप जगताप यांनी दिली आहे.
याप्रकरणी पिडीत अल्पवयीन मुलीच्या आईने पनवेल येथील पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलीस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत अल्पवयीन मुलगी हि आरोपी मामाच्या घरी राहण्यास होती. तेव्हा आरोपी पिडीत मुलीला म्हणाला कि, तुझे गल्लीतील पोराशी संबंध आहेत, असे तुझ्या आईला सांगेन, अशी भिती घालुन आरोपी मामाने वेळोवेळी भाचीवर संमतीशिवाय व ईच्छेविरूध्द शारीरीक संबंध प्रस्तापीत केली. आणि या संबंधातून अल्पवयीन मुलगी गर्भवती झाली.
याप्रकरणी पिडीत पिडीत अल्पवयीन मुलीच्या आईने पनवेल येथील पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.
त्यानुसार, आरोपी मामावर पनवेल येथील पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता,1860 चे कलम 376(2)(n) आणि POCSO कायद्याचे कलम 4, 6, 8, 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी आरोपीला ८ मे २०२२ ला अटक केली होती.
दरम्यान, आरोपीने जामीन मिळवण्यासाठी वकिलामार्फत पनवेल सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने आरोपीचे वकील, फिर्यादीचे वकील, फिर्यादी आणि सरकार पक्ष यांचे म्हणणे ऐकून व त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे तसेच इतर बाबी विचारात घेतल्या. आणि आरोपीला सोमवारी (ता.१ ऑगस्ट)जम्मीन मंजूर केला आहे. ह्या खटल्याचे कामकाज अॅड. स्वरूप जगताप आणि अॅड. दशरथ बावकर यांनी पाहिले.