Pune Crime पुणे : भारती विद्यापीठ पोलीसांनी बलात्कार करणाऱ्या डॉक्टराला बेड्या ठोकल्या आहेत. 32 वर्षीय महिलेला सुरुवातीला मोबाईलवर संपर्क करत मेसेज व कॉल करुन त्याने जवळीक निर्माण केली. दरम्यान महिलेने इंजेक्शन घेण्यासाठी कंबरेवरील कपडे खाली केले असता नराधाम डॉक्टरने तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार कात्रज मांगडेवाडी येथील कल्पनानंद क्लिनिकमध्ये १ जुलै २०२२ पासून आजपर्यंत घडला आहे.
याप्रकरणी एका ३२ वर्षीय महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून डॉ. अमित आनंदराव दबडे (वय २९, रा. सह्याद्री सोसायटी, वाघजाईनगर, आंबेगाव खुर्द) यास पोलीसांनी बेड्या ठोकल्या.
मिळालेल्या माहितीनुसार…!
फिर्यादी महिलेसोबत सुरुवातीला आरोपी डॉ. दबडे याने मोबाईलवरून जवळीक निर्माण केली. त्यानंतर गोड गोड बोलून महिलेला क्लिनिकमध्ये बोलवत शारीरिक जवळीकता करण्याचा प्रयत्न केला. यास महिलेने विरोध केला असता आरोपी डॉक्टरने माफी मागण्याचा बहाणा केला व त्यांना बोलावून घेतले.
फिर्यादी महिलेला इंजेक्शन घ्यावयाचे असल्यामुळे त्या एके दिवशी क्लिनिकमध्ये गेल्या. दरम्यान इंजेक्शनसाठई महिलेने कंबरेवरील कपडे खाली केले असता डॉक्टराने त्यांच्यावर क्लिनिकमध्येच बलात्कार केला.
त्यानंतरही फिर्यादी महिलेची इच्छा नसताना सुद्धा आरोपी डॉक्टरने त्यांच्या पाठलाग केला. या सर्व प्रकाराला कंटाळून शेवटी महिलेने पोलीसात धाव घेतली डॉक्टर विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलीसांनी त्यास अटक केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Pune Crime : खळबजनक! कोंढव्यात 62 वर्षीय ज्येष्ठाचा डोक्यात फरशी घालून खून