Shirur शिरूर : मलठण – कवठे येमाई रस्त्यावरील रावडेवाडी हद्दीत एका अज्ञात भरधाव वाहनाने माजी सरपंच शिवाजीराव मारूती जाधव ( वय ६५ ) राहणार जउळके ( ता. पारनेर ) सध्या राहणार पिंपरखेड ( ता. शिरूर ) Shirur यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने जाधव यांच्या डोक्याला मारला. रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अज्ञात वाहन घटना स्थळावरून पळून गेले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार…!
जाधव हे पिंपरखेड वरून कवठे मार्गे शिक्रापूरला आपल्या मुलीकडे भेटायला होडा शाईन मोटार सायकल क्रमांक एम एच १४ ई टी ६५३९ या गाडीवरून चालले होते. अष्टविनायक रस्त्यावर रावडे वाडी येथील पराग ॲग्रो साखर कारखान्याकडे जाणाऱ्या रस्त्यालगत हा अपघात झाला.
गाडीवरूनच चाक गेल्याने पुर्णपणे चक्काचुर झाला आहे. अपघाताच्या ठिकाणी तीव्र उतार असल्याने कवठे येमाई कडून येणारी वाहने दिसत नाही. तसेच त्या ठिकाणी कारखान्याकडे जाण्यासाठी वळण घेताना अपघात होत आहेत.
घटनास्थळी पोलिस कर्मचारी विशाल पालवे, राजेंद्र गावडे, दामुआण्णा घोडे, डॅा. सुभाष पोकळे, बाळासाहेब डांगे, दिपक रत्नपारखी,सतीश गोडसे, म्हतारबा शेलार, पोलिस पाटील सुदर्शन भाकरे यांनी भेट दिली.
नुकतेच अष्टविनायक रस्त्याचे काम पुर्ण झाले असून वाहने भरधाव वेगाने धावत आहेत. वाहन चालकांनी शिस्तीने वाहन चालविणे गरजेचे असून गतीरोधक बसविण्याची मागणी दत्तात्रेय गडदरे, भाऊसाहेब किठे व परिसरातील नागरिकांनी केली आहे.
या अष्टविनायक रस्त्यावर भाऊसाहेब चव्हाण राहणार शिरसगाव काटा ( ता. शिरूर ) यांचा २२ एप्रिल रोजी दुचाकीवर शिंदेवाडी तिल पिराचा दर्गा येथे जागीच मृत्यू झाला होता. या अष्टविनायक रस्त्यावर अपघाताची मालिका सुरू आहे.