राजेंद्रकुमार शेळके
Pune पुणे – श्री क्षेत्र ओझर येथील श्री विघ्नहर विद्यालय ओझर गणपतीचे या ठिकाणी शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देण्यासाठी ४२ वर्षांनी एकत्र येत शाळा भरवली. सन १९८१ सालापासून अगदी कुमार अवस्थेत जी मैत्रीची गुंफण तयार झाली होती. तिला उजाळा देण्यासाठी मित्र मैत्रिणींची अनोखी गाठभेट घडवण्याचा सुवर्णयोग १६ एप्रिल २०२३ ला जोडून आला. आणि विघ्नहराच्या पवित्र भूमित श्री विघ्नहर विद्यालयात स्नेह मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याला ४३ मुले आणि १५ मुली असे एकूण ५८ विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी केलेल्या कार्याबद्दल गौरव…
या कार्यक्रमाची सुरुवात घोरपडे सर व डुंबरे सर यांच्या हस्ते गणेश पूजन व सरस्वती पूजनाने झाली. यावेळी मुख्याध्यापक साबळे सर, राऊत सर, चासकर सर. सगर सर आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते. घोरपडे सरांनी मार्गदर्शन करताना जुन्या आठवणींना उजाळा दिला. मुलांचे कौतुक केले. माझे वय आणि सन- १९८१ बॅच यांचा अनोखा योगायोग सांगितला. डुंबरे सरांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या कार्याबद्दल गौरव केला. साबळे सरांनी आतापर्यंत सर्वात मोठा स्नेह मेळावा झाल्याचे आवर्जून सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुनील हांडे यांनी केले तर आभार प्रदर्शन तानाजी कवडे यांनी केले.
त्यानंतर नीलायम गार्डन ओझर या ठिकाणी सर्व विद्यार्थी पुन्हा एकत्र आले. तेथे माजी विद्यार्थ्यांनी आपली ओळख, आपले कार्यक्षेत्र, आपली कौटुंबिक माहिती अगदी न लाजता सर्वांना सांगितले. तसेच मुलींनी आपले सासरचे नाव आहे सांगितले. बबन भोर, विक्रम मोरे ,तानाजी कवडे ,भरत भोर ,सुरेश कवडे यांनी मनोगत व्यक्त केले. त्याचप्रमाणे महिला भगिनी मीरा बेनके यांनी आपला संघर्षमय जीवन प्रवास सांगितला. बाळासाहेब कवडे यांनी माजी विद्यार्थ्यांनी शाळेला भरघोस मदत करावी असा मानस व्यक्त केला.
दरम्यान, या भेटीगाठी मुळे अनेक वर्ष दुरावलेली नात्यांची गुंफण पुन्हा एकदा जोडली गेली असे प्रत्येक जण मनोगत व्यक्त करत होता आणि विविध क्षेत्रात काम करणारे आपले मित्र वेळ प्रसंगी आपल्या मित्रांना मदत करतील अशी इच्छा सर्वांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन बाळासाहेब कवडे .साहेबराव मांडे. प्रकाश वायकर ,डॉ. सुनील हांडे ,सुरेश कवडे ,तानाजी कवडे आणि सुलभा जगदाळे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता सुग्रास भोजनाने झाली. भरत भोर यांनी सर्वांचे आभार मानले. आणि पुढच्या वर्षी पुन्हा भेटण्याचा आशावाद व्यक्त केला.