पुणे Wagholi Crime : एकतर्फी प्रेमातून मुलगी बोलत नसल्याच्या कारणावरून वाघोलीतील (Wagholi Crime) एका तरुणाने त्याच्या साथीदारासमवेत तरुणी राहत असलेल्या पार्किंगमध्ये जाऊन तीन दुचाकी पेटवल्याची घटना घडली आहे. Wagholi Crime) ही घटना खांदवेनगर येथे सोमवारी (ता. २४) मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली असून या प्रकरणी एका युवकाला विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे. तर त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Wagholi Crime)
विमाननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
श्रीराम घाडगे (रा. वाघोली, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर त्याचा साथीदार फरार असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी लोहगाव येथील तरुणीच्या वडिलांनी विमाननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांची मुलगी आणि आरोपी श्रीराम घाडगे हे विमाननगर परिसरात एका कॉलेजमध्ये शिकत आहे. श्रीराम याने तरुणीला एकतर्फी प्रेमातून “माझ्यासोबर बोलत जा”, असं म्हणून तिला सतत त्रास देत होता. तिने ही गोष्ट तिच्या वडिलांना सांगितली. तेव्हा त्यांनी आरोपी श्रीराम घाडगे याला “तिला तुझ्यासोबत बोलायचे नाही. उगाच त्रास देऊ नको”, असं सांगितलं.
दरम्यान, तरुणाने त्याचा राग मनात धरुन एका साथीदाराला सोबत घेतलं. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास तक्रारदार यांच्या पार्किंगमध्ये लावलेल्या दुचाकीला थेट आग लावली. त्यात त्यांच्या शेजारी असलेल्या आणखी दोन दुचाकींनाही आग लागून त्यांचे नुकसान झालं आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार एस धेंडे पुढील तपास करत आहेत.