Pune | पुणे : औषधांच्या नावाखाली खुलेआम अवैध मद्याच्या वाहतूक होत असल्याचा पर्दाफाश करण्यास सासवड राज्य उत्पादन शुल्क विभागाला यश आले असून विभागाने मुळशीतून तब्बल ५७ लाखाचा मुद्देमाल सोमवारी (ता.२४) जप्त केला आहे. तर दोघांना अटक केली आहे.
दानाराम चुनाराम नेहरा आणि रूखमनाराम खेताराम गोदरा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औषधांच्या नावाखाली खुलेआम अवैध मद्याच्या वाहतूक होत आहे. अशी माहिती राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाला एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पथकाने पुणे-माणगाव मार्गावरील माले (ता.मुळशी) गावचे हद्दीतील हॉटेल लाल मिर्चच्या समोर एक ६ चाकी ट्रक अडविला.
पोलिसांनी चालकाकडे चौकशी केली असता. चालकाने ट्रकमध्ये औषधे आणि इंजक्शन असल्याचे सांगितले. मात्र पथकाला संशय आल्याने ट्रकची झडती घेण्यास सुरूवात केली. तेव्हा ट्रकमध्ये अवैध मद्याच्या साठा आढळून आला. राज्य उत्पादन शुल्कच्या सासवड विभागाने सर्व माल आणि ट्रक असा एकूण ५७ लाख २५ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कामगिरी सासवड विभागाचे निरीक्षक पी.सी. शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक दीपक सुपे, जवान तात्या शिंदे, रणजित चव्हाण, सुनिल कुदळे, दत्तात्रय पिलावरे, भागवत राठोड, भगवान रणसुरे यांच्या पथकाने केली आहे.
जप्त केलेला मुद्देमाल पुढीलप्रमाणे :
या ट्रकमध्ये गोवा राज्य निर्मित इंपेलियल ब्लु व्हिस्कीच्या 180 मिली क्षमतेच्या 8 हजार 640 बाटल्या (180 बॉक्स), मेकडावेल नं 1 व्हिस्की 180 मिली क्षमतेच्या 2 हजार 640 सिलबंद बाटल्या (55 बॉक्स), रॉयल स्टॅग व्हिस्की 180 मिली क्षमतेच्या 5 हजार 520 सिलबंद बाटल्या (155 बॉक्स), रॉयल चायलेंज व्हिस्की 180 मिली क्षमतेच्या 864 सिलबंद बाटल्या (18 बॉक्स), एडरियल व्हिस्की 750 मिली. क्षमतेच्या 3 हजार 60 सिलबंद बाटल्या (255 बॉक्स) आढळल्या.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Pimpri Crime : व्हिडीओ लाईक करणे तरुणाला पडले नऊ लाखांना ; दुप्पट रक्कम मिळण्याच्या आमिषाचा ठरला बळी