Sampath J Ram बंगळुरु : कन्नड चित्रपटसृष्टतून खळबळजनक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्याने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. अभिनेता संपत जे. रामनं याने वयाच्या 35 व्यावर्षी जगाचा निरोप घेतला आहे. या घटनेनंतर चित्रपटसृ्ष्टीत एकच खळबळ उडाली आहे. गेल्या वर्षीच अभिनेत्याचा विवाह झाला होता. हाताला काम मिळत नसल्यामुळे अभिनेत्याचे तनावातून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे रिपोर्टनुसार समजले आहे.
काम मिळत नसल्यामुळे तनावात..!
रिपोर्टनुसार अभिनेता संपत जे. रामनं याने 22 एप्रिल रोजी नेलमंगला येथील स्वतः च्या राहत्या घरी आत्महत्या केली. मात्र, याबाबत संपतच्या कुटुंबाकडून किंवा जवळच्या व्यक्तीकडून अद्याप प्रतिक्रिया समोर आली नाही. अभिनेता गेल्या काही दिवसांपासून काम मिळत नसल्यामुळे तनावात होता. यातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे.
दरम्यान, संपतच्या पार्थिवावर कर्नाटकातील नेलमंगला येथे असलेल्या एका खासगी रुग्णालयात ठेवण्यात आलं आहे. तर त्याच्या पार्थीवावर 23 एप्रिल रोजी त्याच्या घरी एनआर पुरा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
अभिनेत्याचे ‘अग्निसाक्षी’ या मालिकेत काम केलं होतं. या मालिकेतील त्याचा सहकलाकार विजय सूर्यानं ‘इटाइम्स’ ला दिलेल्या मुलाखतीत संपतविषयी खुलासा केला आहे. विजय सूर्या म्हणाला, ‘तो खूप दिवसांपासून एका चांगल्या प्रोजेक्टच्या शोधात होता.’