Pune Good News | पुणे : पुणे शहराने आता देशपातळीवर नावलौकिक मिळवला आहे. ग्रीन सिटी इंडेक्समध्ये ‘प्लॅटिनम रॅंकिंग’ मिळाल्याने देशातील दुसरी ‘ग्रीन सिटी’ म्हणून पुण्याला प्रमाणित केले आहे. ‘इंडियन ग्रीन बिल्डिंग काउंसिल’ने (आयजीबीसी) पुण्याला ‘प्लॅटिनम रॅंकिंग’ जाहीर करत प्रमाणपत्र दिले आहे.
(आयाजीबीसी) इंडियन ग्रीन एक्झिस्टिंग सिटीज रेटिंग सिस्टम अंतर्गत प्रतिष्ठित इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल प्लॅटिनम प्रमाणपत्र मिळवणारे पुणे हे महाराष्ट्रातील पहिले आणि राजकोटनंतर भारतातील दुसरे शहर ठरले.
‘इंडियन ग्रीन बिल्डिंग काउंसिल’ने (IGBC)‘प्लॅटिनम रॅंकिंग’जाहीर करीत दिले प्रमाणपत्र…
कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज, इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल (IGBC) आणि CREDAI यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘अभिनंदन – ग्रीन पायोनियर्सचा सत्कार’ या कार्यक्रमात पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना राज्यसभा सदस्य वंदना चव्हाण यांनी प्लॅटिनम प्रमाणपत्र देण्यात आले.
‘उत्तम राहण्यायोग्य शहर’ हा टॅग पुण्याचाच…
गेल्या काही वर्षांपासून पुणे शहर हे सर्वात राहण्यायोग्य शहर ठरत आहे. हे शहर कायमच सर्वात राहण्यायोग्य शहर राहिल, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. शहरात विविध पायाभूत सुविधांची उभारणी केली जात आहे. ही उभारणी करताना तसेच ती केल्यानंतरही पर्यावरण संवर्धनसाठी अधिक प्राधान्य दिले जाते.
पर्यावरण संवर्धन आणि विकास यामध्ये योग्य समन्वय साधण्याचा प्रयत्न महापालिकेकडून नेहमी केला जातो. येत्या काळात देखील पुणे महानगरपालिका आणि आमचे सर्व अधिकारी, कर्मचारी हे ‘उत्तम राहण्यायोग्य शहर’ हा टॅग पुण्याकडेच राहिल या दृष्टीने काम करत राहणार, अस विक्रम कुमार म्हणाले.
कसा मोजला जातो?
ग्रीन सिटी इंडेक्ससाठी ‘आयजीबीसी’द्वारे निश्चित केलेल्या निकषांची पाहणी करण्यासाठी संबंधित शहराला त्या निकषांप्रमाणे केलेल्या कामांचा पुरावा सादर करावा लागतो. त्या सर्व कामांचा आढावा, त्याची प्रत्यक्ष पाहणी आयजीबीसीद्वारे केली जाते. त्यानंतर या निकषांना गुण देत त्या आधारे ग्रीन सिटी इंडेक्सचे रेटिंग दिले जाते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!