Mulshi Political News : मुळशी, (पुणे) : पुणे जिल्ह्यातील मुळशी (Mulshi) तालुक्यातील भुकूम गावच्या (hukum village) इतिहासामध्ये (history) पहिल्यांदाच ग्रामपंचायतीचा ( gram panchayat) सरपंच आणि उपसरपंच (sarpanch and sub-sarpanch) पदाचा कारभार बहीण-भाऊ बघणार आहेत. सख्खे मावस बहीण आणि भाऊ सरपंच आणि उपसरपंचपदी (become sarpanch and deputy sarpanch ) विराजमान झाले असल्यामुळे नागरिकांकडून त्यांचे कौतुक ( appreciated by the citizens) करण्यात येत आहे. (Mulshi Political News)
सरपंचपदी मयुरी आमले तर उपसरपंचपदी अंकुश खाटपे यांची बिनविरोध निवड
भुकूम ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मयुरी आमले यांची बिनविरोध निवड झाली तर उपसरपंचपदी अंकुश खाटपे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
मयुरी आमले यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी सुहास कांबळे यांनी मयुरी अभिलाष आमले यांना सरपंच म्हणून घोषित केले. निर्वाचित सरपंच आणि उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची मिरवणूक भुकूम गावठाण ते आंग्रेवाडी पर्यंत काढण्यात आली.
या अगोदरच्या सरपंच गौरी प्रसाद भरतवंश यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्यामुळे सरपंच पद रिकामे झाले होते. भुकूम गावच्या इतिहासात पहिल्यांदा ही निवड झाल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. गावचा कारभार महिलेच्या हाती आल्याने याचा गावच्या विकासाला मोठा हातभार लागणार आहे.
दरम्यान, युवा सरंपच झालेल्या मयुरी आमले गावाच्या विकासासाठी मोठा बदल करणार आहेत. यामुळेच गावकऱ्यांनी विश्वासाने त्यांची बिनविरोध निवड केली आहे. यावेळी तलाठी नामदेव पासलकर ग्रामसेवक भागवत यादव,उपसरपंच अंकुश खाटपे, ग्रामपंचायत सदस्य सचिन हगवणे,सचिन आंग्रे, निलेश ननावरे, गौरी प्रसाद भरतवंश,रेखा योगेश वाघ, सुवर्णा रामदास आंग्रे, सुवर्णा सुभाष पानसरे, यावेळी पोलिस पाटील सतीश गुजर, माऊली आंग्रे, दिलीप चोरघे, योगेश वाघ, शरद पवार, पांडूरंग मराठे, नितीन कुडले, राजेंद्र आंग्रे,पोलीस कर्मचारी अनिता रवळेकर,निवास जगदाळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.