मुंबई : Nana Patole – आगामी काळात विधानसभेच्या २०२३ च्या निवडणुकांची वाट कशाला बघायची ? आताही मुख्यमंत्रीपद आमच्याकडे ठेवायची आमची तयारी, असे राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शुक्रवारी एका वृत्तसमुहाच्या मुलाखतीत सांगितले. त्यात त्यांनी थेट मुख्यमंत्री होण्याचीच इच्छा बोलून दाखविली. तसेच पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात आम्ही नाईलाजाने काम केलं, असा गौप्यस्फोटही राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. त्यामुळे आता या वक्तव्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) संतापले आहेत. यामुळे ‘नाईलाज’मुळे महाविकास आघाडीत फूट पडणार का ? अशी राजकीय वर्तळात चर्चा रंगली आहे. (Nana Patole)
अजित पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात संघर्ष पुन्हा वाढणार…
दरम्यान, अजित पवरांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात संघर्ष पुन्हा वाढणार आहे.
नाईलाज हा शब्द का वापरत आहात ? असे होते तर मग तुम्ही शपथच घ्यायला नको होती. तुम्ही पदावर बसून खदखद व्यक्त करण्यापेक्षा पद सोडून बोलायला पाहिजे होतं. पृथ्वीराज चव्हाण यांच्या विषयी अजित पवार बोलतील ही अपेक्षा नव्हती. त्यांच्याबद्दल असे बोलणे चुकीचे आहे. ते खुर्चीवर असताना तुम्हाला असं वाटत होतं तर त्यावेळीच सोडून जायला हवं होते, असे पटोले म्हणाले आहेत.
आताही मुख्यमंत्री होऊ शकतो या अजित पवारांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना ‘अजित पवारांकडे १४५ आमदार असतील’ तर त्यांनी मुख्यमंत्री व्हावं. सारखं मी मुख्यमंत्री बनतो, असं म्हणायची काही गरज नाही. खरं तर आज राज्यात अनेक प्रश्न आहेत. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. शेतकरी आत्महत्या करत आहेत. खारघरमध्ये श्रीसेवकांचा मृत्यू झाला. महागाईमुळे जनता त्रासली आहे. बेरोजगारी वाढत आहे, त्यामुळे अशा राजकीय विषयांकडे लक्ष देण्यापेक्षा या मुद्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे. अशी प्रतिक्रिया देत पटोले यांनी संताप व्यक्त केला.
गौतम अदाणी आणि शरद पवार यांच्या भेटीवरही भाष्य केलं आहे. कोण कोणाला भेटतं हा ज्याचा-त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. मात्र आम्ही सर्व घडामोडींकडे लक्ष ठेऊन आहोत, अशी प्रतिक्रिया नाना पटोलेंनी दिली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Nana Patole : खोके सरकार नक्की काय लपवतंय? चेंगराचेंगरीचा व्हिडिओ ट्वीट करत नाना पटोले म्हणाले…
भाजपप्रणीत नवीन सरकारने ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नयेत : नाना पटोले यांची मागणी…!