Pune Crime पुणे : पुण्यात ‘बंटी-बबली’च्या जोडीने धुमाकूळ घातला असून शेकडोहून अधिक नागरिकांना तब्बल १६ कोटी रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सदर प्रकार हा सन २०१८ ते २०२३ या कालावधीत घडला आहे.
APS वेल्थ वेंचरचे संचालक अविनाश अर्जुन राठोड आणि त्यांची पत्नी विशाखा अविनाश राठोड (रा.आनंदबन सोसायटी, रावेत) व इतर साथिदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वाकड येथील डॉ. जयदीप शंकरराव जाधव (वय-५० रा. कस्पटे वस्ती रोड, वाकड) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार…!
आरोपी अविनाश राठोड आणि त्यांच्या पत्नी विशाखा राठोड यांनी ज्यादा परताव्याचे अमिष दाखवून फिर्यादी आणि त्यांच्या नातेवाईकांकडून वेगवेगळ्या स्कीम मध्ये १ कोटी पेक्षा जास्त रुपयांची गुंतवणूक करून घेतली.
दरम्यान, फिर्यादी यांनी जेव्हा परताव्याची मागणी केली तेव्हा त्यांना एकही रुपया परत मिळाला नाही. अशा प्रकारे या दोघांनी मिळून शेकडो लोकांना तब्बल १५ कोटी रुपयांचा गंडा घातला. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणी आता दोघांच्या विरोधात चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चतु:श्रृंगी पोलीस करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Pune Crime : गाडीच्या काचा फोडून चोऱ्या करणाऱ्या परप्रांतीय टोळीच्या आवळ्या मुसक्या..
Pune Crime News : वर्गणीस्वरूपात खंडणी मागणाऱ्या चौघांना बेड्या ; दोन सराईतांचा समावेश