अजित जगताप
Vaduj वडूज : आंबला, पंजाब या ठिकाणी अपघात झालेल्या शहीद मयूर यादव यांच्या दुःखद निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे. दोन दिवसांपूर्वी शोकाकुल वातावरणात वडूज Vaduj या ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले .
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शेत यादव यांच्या नातेवाईकांची घेतली भेट
बुधवारी दुपारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शेत यादव यांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्रीपदी कामाचा चव्हाण यांना अनुभव असल्यामुळे सेनादलातील अनेक बाबींची त्यांना माहिती असल्यामुळे त्यांनी या वेळेला मार्गदर्शन केले.
या वेळी शहीद मयूर यादव यांचे वडील जयंत यादव, आई मंगल यादव, मयूर यादव यांची पत्नी राधिका यादव, बंधू हर्षद यादव व तीन वर्षाची चिमुकली अद्वेता उपस्थित होते.
तसेच राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, रणजीत भैय्या देशमुख व खटाव तालुका अध्यक्ष डॉ. संतोष गोडसे अशोक आबा गोडसे, डॉ. महेश गुरव, इम्रान बागवान, राहुल सजगणे, आबासाहेब भोसले, भारतीय बौद्ध महासभा संघटक सुधाकर शिलवंत ,नरेश देसाई व यादव कुटुंबियातील सदस्य तसेच नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
झालेली घटना अत्यंत दुर्देवी आहे. आपल्या सर्वांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देव अशी मनोकामना चव्हाण यांनी केली. तसेच जे काही सेनादलाबाबत लागणारे जे सहकार्य आहे. ते मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.