Fraud School लोणी काळभोर : शिक्षणाची पंढरी, शिक्षणाचे माहेरघर अशी ओळख असणाऱ्या पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. लोणी काळभोरसह (ता.हवेली) पुणे जिल्ह्यात तब्बल १२ शाळा अनधिकृत Fraud School असल्याचे उघडकीस आले आहे.
पुण्यातील अनधिकृत शाळांमध्ये पुरंदर, खेड, दौंड, मुळशी आणि हवेली तालुक्यातल्या शाळांचा समावेश आहे. बोगस शाळांवर कारवाई करत जिल्हा परिषदेनं पावलं उचलली, काही शाळा बंदही झाल्या. पण काही मात्र अद्यापही सुरुच होत्या. त्यामुळे या अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेऊ नका. असे आवाहन पुणे जिल्हा परिषदेनं केले आहे.
दरम्यान, दरवर्षी राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर साधारण १३ जूनच्या सुमारास शाळा सुरु होतात. पण, यंदाच्या वर्षी मात्र शाळा १५ जूनला सुरु होणार असून, यापुढे शाळा या दिवशीच सुरू होणार असल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. त्यामुळं दोन दिवसांनी का असेना, पण उन्हाळी सुट्टी वाढली. यामुळे विद्यार्थ्यांनाही याचा आनंद आहे.
जिल्ह्यातील अनधिकृत शाळांची यादी पुढीलप्रमाणे…
१) पुणे इंटरनॅशनल पब्लिक स्कूल (लोणी काळभोर, ता. हवेली)
२) कल्पवृक्ष इंग्लिश मीडियम स्कूल (किरकटवाडी, ता. हवेली)
३) क्रेझ इंग्लिश मीडियम स्कूल (कोल्हेवाडी, ता. हवेली)
४) किंडर गार्डन इंग्लिश मीडियम स्कूल (खडकवासला, ता. हवेली)
५) प्रियांस फ्री प्रायमरी स्कूल (कासुर्डी, ता. दौंड)
६) केके इंटरनॅशनल स्कूल (बेटवाडी, ता. दौंड)
७) मंगेश मेमोरियल इंटरनॅशनल स्कूल (ता.दौंड)
८) अंकुर इंग्लिश स्कूल (जांभे, ता. मुळशी)
९) साई बालाजी पब्लिक स्कूल (नेरे, ता. मुळशी)
१०) एस एन बीपी टेक्नो स्कूल (बावधन, ता. मुळशी)
११) श्रीनाथ इंग्लिश मीडियम स्कूल (वीर, ता. पुरंदर)
१२) जय हिंद पब्लिक स्कूल (भोसे, ता. खेड)