(Uruli Kanchan) उरुळी कांचन, (पुणे) : विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांना वाव देऊन व्यक्तिमत्व विकास साधावा व महाविद्यालयाचा लौकिक वाढवावा याबाबत प्रयत्न करावेत असे प्रतिपादन काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण धायगुडे यांनी केले.
उरुळी कांचन (ता. हवेली) येथील महात्मा गांधी सर्वोदय संघ संचलित पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन मंगळवारी (ता. १८) ते गुरुवारी (ता. २०) करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन उपनिरीक्षक धायगुडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बाळासाहेब भगत होते. या सांस्कृतिक महोत्सवात महाविद्यालयात ट्रॅडिशनल डे, हॉलिवूड डे, बॉलिवूड डे, फॅशन शो, मिस मॅचडे याचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब भगत म्हणाले…!
“आपली संस्कृती परंपरा वारसा जतन करण्याचा प्रयत्न प्रत्येक विद्यार्थांनी करावा. प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपापल्या गावांमध्ये एकोपा राखून शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करून उच्चपदस्थ प्राप्तीसाठी सातत्याने प्रयत्नशील राहून समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न करावा असे प्रतिपादन केले.
दरम्यान, या कार्यक्रमाचे या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. अविनाश बोरकर, श्री माळगे साहेब, प्रा. विजय कानकाटे ,प्रा. शुभांगी रानवडे, सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. डॉ. निलेश शितोळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अनुप्रिता भोर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. रेवती आंबेकर यांनी मानले.