Uruli Kanchan | उरुळी कांचन, (पुणे) : कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामपंचायतीचे कै. माजी सरपंच धोंडीबा हरिभाऊ शितोळे यांचे चिरंजीव कैलास धोंडीबा शितोळे (वय – ६६) यांचे मंगळवारी (ता. १८) अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. कोरेगाव मूळ ग्रामपंचायतीचे माजी सदस्य हरीश आबा शितोळे यांचे ते चुलत बंधू होत.
दरम्यान, कैलास शितोळे यांच्या पार्थिवावर चौधरी वस्ती परिसरात सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.